आमदार प्रणिती शिंदे यांनी केली भुसंपादन अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग अधिकारयासोबत संयुक्त बैठक
सोलापूर // प्रतिनिधी
आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दि. 21 ऑक्टोंबर 2020 रोजी श्रध्दा एमरल्ड कॉम्प्लेक्स, राजेंद्र कासवा, अक्कलकोट नाका समोर, गांधी नगर, सोलापूर या ठिकाणी सोलापूर अक्कलकोट रोड येथील भुसंपादन केलेल्या जमिनीची रक्कम बाजार भावाप्रमाणे देण्यात यावे याकरीता संबंधित अधिकारी व प्लॉटधारक यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये NHAI चे न्याशनल हायवेचे एक्झीकेटिव इंजिनिअर श्री. वाबळे, उपजिल्हाधिकारी व भुसंपादन अधिकारी भाग 1 चे श्री. दिपक शिंदे आदि. उपस्थित होते.
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड येथे भुसंपादन केलेली जमिन कमी जास्त घेण्यात आलेली आहे. याकरीता त्यांना दोन वेळा नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे. सदर भुसंपादन केलेल्या जमिनीची रक्कम बाजार भावाप्रमाणे न देता त्यांना सदरची रक्कम कमी भावाने देण्यात आलेले आहे. सदर लाभार्थी यांनी सदर जागेची रक्कम बाजार भावापेक्षा कमी असल्याची तक्रार आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली. यासंदर्भात दखल घेवून आमदार प्रणिती शिंदे यांची संबंधित अधिकारयासमवेत बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये सकारात्मक प्रतिसाद देत या जागेची फेर समिक्षा करण्याचे आश्वासन अधिकारयानी दिले. यावेळी पेंटप्पा गड्डम, राजेंद्र कासवा, प्रकाश कोडम, कोंडले नरसिंगराव, वेणु कुरापाटी, रवि चिटयाल, देसाई (विडी कारखाना मालक), आनंद सादुल, श्रीधर कोंडले, महेंद्र भोमकर, कांतू बिराजदार, इसाक बागवान व बहुसंख्य प्लॉटधारक उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.