आम्ही भीक नाही,हक्क मागतोय, गरज पडेल तेव्हा सरकार पाडू:- शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे





पंढरपूर // प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे.मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका,संयम कधी सोडायचा माहीत आहे,पण गरज पडेल,त्यावेळी तलवारी काढू किंवा महाविकास आघाडी सरकार पाडू.  असा इशारा देत आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत,अशा शब्दांत शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.याच

बरोबर १९०२ मध्ये शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिले.त्यात मराठा समाजाचाही समावेश होता.शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे आवश्यक आहे.८०टक्के मराठा समाज गरीबआहे. 

मात्र आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो आहोत.आम्हाला आता गृहीत धरु नका आणि कायदा हातात घ्यायची वेळ आमच्यावर आणू नका.माझ्या रक्तात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज आहेत.शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार,असे शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी म्हटले आहे.याशिवाय,आम्ही दिल्लीला पण येण्यासाठी घाबणार नाहीत,अशा  शब्दांत शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे  यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला आव्हान दिले आहे.आम्हाला कोणत्याही पक्षाचे काही घेणे देणे नाही.राज्यात होणारी मराठा आंदोलने राष्ट्रवादी,काँग्रेस,शिवसेना,भाजपा या चारीही पक्षाचे आम्ही काय गुलाम नाही.आमचे आरक्षण द्या.असेही शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी यावेळी म्हटले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget