सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पटलावर चे एक यशस्वी बाणेदार नेतृत्व:- दिलीप (बापू) धोत्रे





सोलापूर // प्रतिनिधी 

संपूर्ण भारत देशामध्ये चालू वर्षी 2020 साली. 22 मार्च रोजी संपूर्ण देश लाॅकडाऊन झाला. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लाॅकडाऊनचीही घोषणा करण्यात आली. ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये गोरगरीब कष्टकरी व दीनदलित शेतकरी कष्टकरी आपले जीवन अत्यंत साधेपणानं व्यतीत करत असताना या अचानक पडलेल्या लाॅकडाउनमुळे. तो पूर्णपणे कोलमडून गेला. त्याच वेळी सर्व जग व संपूर्ण महाराष्ट्र थांबलेला असताना सर्वसामान्य कष्टकऱ्यांसाठी एकच आशेचा सूर्य किरण दिसला तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापू) धोत्रे यांच्या नावाने. त्यांनी सुरुवातीला सर्व गोरगरीब जनतेसाठी सर्व व निरुपयोगी खाद्यपदार्थांचे पॅकेट्स तयार करून सर्व ठिकाणी वाटप करण्यास सुरुवात केली. सर्व शहरी भागातील व ग्रामीण भागातील जनतेला ज्या रोजच्या जगण्यासाठी गोष्टी लागतात त्या वाटप करण्याचे सर्वात मोठे पुण्याचे काम दिलीप (बापू) धोत्रे यांनी हाती घेतले होते. त्यांनी सर्व व वंचित घटकांना तेल,डाळ, शेंगदाणे गहू आणि तांदूळ याचबरोबर इतरही काही जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात घरोघरी जाऊन वाटप केले. यामुळे गोरगरीबांना बरोबर मध्यमवर्गीय सुद्धा सुखावले.

त्याचबरोबर महाभयंकर अशा कोणाच्या महामारी मध्ये सर्व समाजातील सर्वात मोठा घटक म्हणजे आपले सर्व वर्तमानपत्रांचे व न्यूज चॅनेल चे पत्रकार यांनी अतिशय आपला जीव धोक्यात घालून सर्व रिपोर्टिंग केले अशा सर्व पत्रकार बांधवांचे एक सामाजिक बांधिलकी म्हणून दिलीप बापू धोत्रे यांनी त्यांचा आयुष्यभरासाठीचा जीवन विमा (इंश्योरन्स) उतरविला. यासाठी त्यांनी सर्व पत्रकारांना एकत्र आणत हे मोठे  काम केले. त्याचबरोबर दिलीप बापू धोत्रे यांनी सर्व पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील पोलिस पाटलांचा जीवन विमा म्हणजे इन्शुरन्स आपल्या स्वखर्चाने उतरविला. आज आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय पटलावर अनेक मोठमोठे राजकीय प्रस्थ असतानासुद्धा सर्वसामान्यांसाठी व इतर घटकांसाठी समोर येऊन एक आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून दिलीप (बापू) धोत्रे यांनी खूप मोठे असे कार्य केले आहे.


 त्यांनी पंढरपूर शहरातील सर्व समाजाला त्यामध्ये त्यांनी कुठलाही दुजाभाव न करता सर्वांना एकसारखी मदत केली त्यांनी कोरोणाच्या लाॅकडांऊनमध्ये. सर्व पंढरपूर शहरातील टांगेवाले व बैलगाडी वाले यांच्या सर्व पशूंना (घोडे व बैल) मोफत चाऱ्याचे वाटप केले. या महान ॶशा त्यांच्या कामाबद्दल जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व त्यांच्या सर्व सहकार्याने व कार्यकर्त्यांनी यावेळी दिलीप बापूंना मनापासून साथ दिली त्यांच्या प्रत्येक कामामध्ये आपला हातभार लावला यामध्ये संपूर्ण पंढरपूर तालुका व शहरातील समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.

अशा तेजतपस्वी व  सूर्यासारख्या चकाकणाऱ्या दिलीप (बापूंना) एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेची संधी मिळावी व हा बुलंद असा आवाज एकदा महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये गर्जावा अशी माझ्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकाराची  प्रामाणिक इच्छा आहे.

संपादक:- गुरूप्रसाद कुलकर्णी

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget