वृत्तसंस्था // प्रतिनिधी
शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा अभास झालेल्या रोहित पवारांनी त्यांच्या खांद्यावरून खाली मतदारसंघात उतरावे, असा खोचक सल्ला भाजप नेते गोपचंद पडळकर यांनी रोहित पवारांना दिला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पडळकर हे करमाळा येथून औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी जात होते. सकाळी पावणे आठच्या सुमारास पडळकर हे पवार यांच्या मतदारसंघातील मिरजगाव येथे आल्यानंतर तेथील लोकांसोबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी खराब रस्त्यावर उभा राहून व्हीडिओ बनवला, व तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.