वृत्तसंस्था // प्रतिनिधी
शिवसेनेचे खेड-आळंदी विधानसभेचे माजी व प्रथम आमदार सुरेश गोरे(वय 57)यांचे आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. सुरेश गोरे यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर मागील 20 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, या लढाईत आज त्यांना अपयश आले. त्यांच्या शांत, मनमिळाऊ व संयमी स्वभावामुळे त्यांनी राजकारण व समाजकारणात वेगळं ठसा उमटवला होता. तालुक्यात सुरेश गोरे यांनी भाऊ या नावाने आपली ओळख निर्माण केली होती.राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या गोरे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषवले होते. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले होते. राजकीय गणिताच्या समीकरणात सुरेश गोरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी तीस हजारांवर मतांनी रोगे यांनी दिलीप मोहिते पाटील यांचावर मात केली होती. त्यांच्या रूपाने खेड तालुक्याच्या इतिहासात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची नोंद झाली.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.