रत्नागिरीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार


सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर व रत्नागिरीत पुढच्या वर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार आहे़ शिवाय विद्यापीठाच्या आॅनलाइन परीक्षे दरम्यान झालेल्या सायबर हल्लयाबाबत विद्यापीठ सायंकाळी सायबरसेलकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सोलापूर जिल्हा दौºयावर होते़ सोलापूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. प्रणिती शिंदे, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना सामंत म्हणाले की, मुंबई, पुणे, सोलापूर व अन्य विद्यापीठाच्या आॅनलाइन परीक्षेवेळी सायबर अटॅक झाल्याने सर्व्हेर क्रॅश होऊन परीक्षांमध्ये व्यत्यय आला आहे़ त्यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात येणार आहे़ सोलापूर विद्यापीठाच्या आवारात अडीच लाख रूपये खर्चुन अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे़ या कामाचा शुभारंभ २८ किंवा २९ आॅक्टोबरला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचे नियोजन असल्याचे सामंत यांनी सांगितले़ राज्यातील विद्यापीठ कर्मचाºयांचे सातव्या आयोगासाठी आंदोलन सुरू आहे, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget