सोलापूर // प्रतिनिधी
केंद्र सरकारने व राज्य सरकारने मोठमोठ्या उद्योजकांची हजारो कोटीची कर्जे माफ केली आहेत पण ज्यांनी बचत गटांचे कर्ज घेऊन छोटा उद्योग सुरू केला कोरोनामुळे व्यवसाय बंद पडल्याने जगणेही मुश्कील झाले आहे त्यामुळे मोठ्या उद्योगपतींची कर्जे माफ करणारे छोट्या उद्योजकांची का केली जात नाहीत अशा प्रश्न सरकारला विचारीत छोट्या उद्योगांची कर्जे माफ व्हावीत अशी मागणी मनसे चे सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांनी केली.
करकंब येथील पत्रकार परिषदेत मनसे चे प्रदेश सरचिटणीस दिलिप धोत्रे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणावर चौफेर टीका केली, महिलांनी छोट्या उद्योगासाठी मायक्रोफायनान्स कर्ज घेतले आहेत, त्या कर्जाच्या विमा संरक्षणासाठी त्याच्याकडून ठराविक रक्कम ही घेतली आहे परंतु फायनान्स वाल्यांनी ती विमा कंपनी ला भरली नाही त्यामुळे ती रक्कम महिलांना परत करावी किंवा कर्ज माफ करावे, वीज बील कोरोना येण्यापूर्वी होते तेवढेच आकाराने गरजेचे असताना वाढीव बील आकारले आहे, व्यवसाय चालत नसल्याने घरपट्टी माफ करावी अशी मागणी करीत मूलभूत प्रश्नांनी ग्रासलेल्या सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी मनसे च्या माध्यमातून राज्य भर आंदोलन केले जात असल्याचे दिलीप (बापु) धोत्रे यांनी सांगितले.
पंढरपूर येथे बहुतांश व्यवसाय विठ्ठल मंदिरावर अवलंबून आहेत विठ्ठल मंदिर बंद असल्याने येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे विठ्ठल मंदिर चालू करण्यासाठी आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे कोणालाही नोकरी वरून कमी करू नका त्यांचे वेतन द्या असे राज्य सरकार सांगत असले तरी लाखो तरुणांना नोकरी वरून काढून टाकले आहे, त्यामुळे एकाही कंपनी वर सरकारने कारवाई केली नाही उलट राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा वेतन सरकार देत नाही, त्यामुळे नोकरदारांच्या मनात भीतीने वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्य जनतेच्या प्रश्नांवर विरोधीपक्ष गप्प राज्य सरकार चुकत असेल त्याठिकाणी विरोधी पक्ष म्हणून भाजप ने सक्षम भूमिका घेणे आवश्यक होते परंतु ते सुशांतसिंग रजपूत, कंगना बाबत आवाज उठवीत आहेत, सामान्य जनता, महिला, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांवर आवाज उठवताना दिसत नाहीत असे सांगत त्याना फक्त सरकार पाडण्याचा विचार आहे,सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका नाही त्यामुळे सामान्य जनतेला आता मनसेच न्याय मिळवून देईल असा विश्वास दिलीप (बापु) धोत्रे यांनी व्यक्त केला.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.