जनकल्याण हॉस्पिटल चे ऋण मी कदापि विसरणार नाही:-माजी जि.प. सदस्य भानुदास पाटील




सोलापूर // प्रतिनिधी 

वसंतदादा काळे मेडिकल फाऊंडेशन संचलित, जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर ,येथे , कोरोना या महाभयंकर आजाराचा प्रादुर्भाव झालेने ,फोडशीरस ता माळशिरस येथील,माजी जिल्हा परिषद सदस्य व शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर चे माजी उपाध्यक्ष मा भानुदास पाटील  हे ऍडमिट होते त्याबाबत त्यांनी न्यूज प्रतिनिधींशी बोलताना आपले विचार व्यक्त केले,       दि 25 । 09।2020,रोजी ,कोरोना ची बाधा झालेने  ऍडमिट केले , सुरुवातीला श्वास घेण्यास अडचण येत  होती ,ताप व दम लागणे असा त्रास होत होता, जनकल्याण हॉस्पिटल मधील फिजिशियन डॉ अजित जाधव ,इतर डॉक्टर्स,नर्सिंग स्टाफ ,यांनी  माझी योग्य ती काळजी घेतली, हॉस्पिटल मध्ये खूप स्वच्छता असलेने मन प्रसन्न राहिले, सामाजिक बांधिलकी जोपासत योग्य उपचार झाले व मी आज दि 5।10 2020 रोजी त्रास मुक्त  झालो आहे,वसंतदादा काळे मेडिकल फाऊंडेशन चे  संस्थापक अध्यक्ष  डॉ सुधीर शिनगारे हे वैयक्तिक सर्व पेशन्ट वर लक्ष ठेवून सर्व पेशन्ट व नातेवाईक याना धीर देतात,  डॉ अनिल काळे, डॉ अमृता म्हेत्रे,डॉ भीमराव चव्हाण,डॉ बागल ,डॉ सतीश बागल, सद्दाम मणेरी हे रुग्ण सेवेसाठी नियोजन उत्तम करतात.

 महाराष्ट्र सहित संपूर्ण देशावर कोरोना विषाणूचं महासंकट आहे त्यामुळे कोव्हिड आजार झालेल्या पेशन्ट ला काही त्रास होत असल्यास व ऍडमिट ची गरज असल्यास त्यांनी जनकल्याण हॉस्पिटलशी संपर्क साधावा ,असे आवाहन वसंतदादा काळे मेडीकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सुधीर शिनगारे यांनी केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget