राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मा श्री श्रीकांत शिंदे यांनी केली उपमुख्यमंत्री मा श्री ना अजित दादा पवार यांच्या कडे मागणी.
सोलापूर // प्रतिनिधी
गेली 12 वर्षापूर्वी जातप्रमाणपत्र अवैध झालेच्या कारणावरुन महाराष्ट्र राज्यातून हजारो शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले होते.त्या नंतर या समाजाने लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने व उपोषणे करुन शासन दरबारी न्याय मागितला होता.तेव्हा 21-12-2019 रोजी मायबाप शासनाने एक शासन निर्णय काढून सेवेतून कमी केलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करुध 11 महिने सेवेत घेण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचे उद्धवस्त झालेले कुटुंब पुन्हा एकदा उभे राहिले आहेत.
सदरच्या कर्मचाऱ्यांना 11 महिन्या नंतर सेवेत कायम करावे का कसे? यासाठी शासनाने आदरणीय मंत्री मा.छगनरावजी भुजबळ यांचे अध्यक्षेतेखाली एक कमिटी स्थापन केली आहे.या कमिटीच्या सकारात्मक अहवालावर महाराष्ट्रातील या समाजातील शासकीय कर्मचाऱ्यांचे पुढील भविष्य अवलंबून आहे.तेव्हा नव्याने सेवेत घेतलेल्या व पूर्वी सेवेत असलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय देवून त्यांना सेवेत कायम करावे अशा आशयाचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मा श्री श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.