वृत्तसंस्था // प्रतिनिधी
नेहमीप्रमाणेच बोगस ठराव करून ग्रामपंचायत कार्यालय सार्वजनिक सभागृहाच्या ठिकाणी हलवण्याचा बेकायदेशीर प्रयत्न करणारे अतिशय कर्तव्यदक्ष सरपंच खोटं बोलत आहेत. कारण आजच्या लोकमत वर्तमानपत्रात बाजू मांडताना त्यांनी झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घेऊन कार्यालय सार्वजनिक सभागृहात हलविले जात असल्याचे सांगितले आहे. तसे त्यांच्याकडे कुठलेही लेखी पत्र नाही,ग्रामसेवक यांना विचारले असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कुठलेही परवानगीचे पत्र नसल्याचे सांगितले. प्रश्न असा आहे की, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच विठ्ठल बझारची जागा सार्वजनिक सभागृहासाठी खुली करून देण्यासाठी 1/10/2018 रोजी आदेश दिले आहेत, तेच मुख्य कार्यकारी अधिकार सार्वजनिक सभागृहाच्या जागेत ग्रामपंचायत कार्यालय आणण्यासाठी कशी परवानगी देतील? लोकांना वेड्यात काढण्याचे धंदे आता सरपंचांनी बंद केले पाहिजेत. आणि आहे त्या ठिकाणी कार्यालयासाठी जागा अपुरी पडत आहे म्हणून सरपंच सांगत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात सुसज्ज व मोठी इमारत टेंभुर्णी ग्रामपंचायतीची असताना विनाकारण ग्रामपंचायत कार्यालय इतरत्र नेऊ नये व आपल्या बगलबच्याना फर्निचरचे टेंडर देऊ नये ही मागणी आम्ही केलेली आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.