अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शिबीराचे आयोजन

 

 

सोलापूर // प्रतिनिधी 

अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणी कोरोना विषाणूबाबतच्या सूचनांचे पालन करून नोव्हेंबर महिन्याच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

            शिबीरासाठी येणाऱ्या अर्जदारांनी मास्कचा वापरविल्हेवाट लावण्याजोगे हातमोजे आणि सॅनिटायझर घेऊन यावे. शिबीरामध्ये एकमेकापासून सहा फुटाचे अंतर ठेवावे. पक्क्या परवान्याची चाचणी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनावर घेताना एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज करून दुसऱ्या उमेदवाराची चाचणी घ्यावीअसे आवाहन करण्यात आले आहे.

 

            हे शिबीर सांगोला शासकीय विश्रामगृह-11 नोव्हेंबर 2020टेंभुर्णी शासकीय विश्रामगृह येथे 12 नोव्हेंबरकरमाळा शासकीय विश्रामगृह-18 नोव्हेंबरमाढा शासकीय विश्रामगृह-19 नोव्हेंबरकुर्डूवाडी शासकीय विश्रामगृह-25 नोव्हेंबरमोडनिंबमध्ये उपविभागीय अभियंतासीना-माढा प्रकल्प उपविभाग-4 यांचे सांस्कृतिक भवन-26 नोव्हेंबरला होणार आहे.  

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget