पंढरपूर ते वाखरी रस्ता राष्ट्रीय महार्गात घेवून काँक्रीटीकरण करावा -आ.प्रशांत परिचारक




पंढरपूर // प्रतिनिधी

पंढरपूर ते वाखरी रस्ता राष्ट्रीय ‘हा‘महार्गात समाविष्ट करून काँक्रीटीकरण करावा अशी मागणी राष्ट्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग, भारत सरकारचे केंद्रीय मंत्री ना.श्री.नितीन गडकरीसाहेब यांच्याकडे लेखी पत्राव्दारे आ.प्रशांत परिचारक केली आहे. 



श्री विठुरायाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे नेहमीच हजारो वारकरी भाविकभक्त भेट देत असतात. यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत एकनाथ ‘महाराजांच्या पालखी मार्ग म्हणजेच आळंदी-पंढरपूर, देहु-पंढरपूर, पैठण-पंढरपूर या मार्गाचे तसेच पंढरपूरला जोडणारे सर्वच मार्गांचे महार्गात रूपांतर करून चौपदरीकरण करण्यासाठी ना.श्री.गडकरीसाहेब यांनी निधी उपलब्ध करून दिला असून सदरचे काही प्रगतीपथावर आहे. 



पंढरपूर ते आळंदी या राष्ट्रीय महर्गातील वाखरी ते पंढरपूर अंदाजे अंतर ५ ते ६कि हा टप्पा पंढरपूर नजीक आहे या ठिकाणी बायपास रोड दिल्यामुळे त्यातून वगळला गेला आहे. हा रस्ता मोठ्या प्रमाणात वाहतूकीचा असून पंढरपूरातील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत तुकाराम महाराज आदींसह प्रमुख पालख्या  वाखरी येथे आल्यानंतर  त्यांचे स्वागतासाठी कर्नाटक, मराठवाडा आदीं ठिकाणाहून येणा-या इतर सर्वच पालख्या वाखरी या ठिकाणी थांबत असतात. त्यावेळी वाखरी यास्थानी दरवर्षी रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्यानंतर दशमिला सायंकाळी या सर्व पालख्यांसह सुमारे १० लाखाहून अधिक वारकरी या रस्त्यांवरून एकाचवेळी एकत्रित मार्गक्रमण करीत असतात. तोच गरजेचा टप्पा या राष्ट्रीय महार्गाचे आराखड्यातून वगळला गेला असल्याचे केंद्रीय मंत्री श्री.गडकरी साहेब यांना कळविले आहे. 

हा रस्ता करताना वाखरी ते पंढरपूर या ठिकाणी सद्यास्थितीत दुभाजकासह चारपदरी रस्ता आहे. त्यामुळे नवीन जमीन भूसंपादीत करण्याची गरज भासणार नाही.

वाखरी ते पंढरपूर हा अंदाजे ६ किमिचा टप्पा राष्ट्रीय महार्गात समाविष्ट करून त्याचे काँक्रीटीकरण झाल्यास पंढरपूरकरांची व वारकरी भाविकांची पुढील अनेक वर्षाची सोय होईल असे आ. परिचारक यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget