पांडुरंग कारखान्याचे ऊस गाळप झाले सुरू:- कार्य. संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते केली पूजा




सोलापूर // प्रतिनिधी

श्रीपुर ता.माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप आज प्रत्यक्षात सुरू झाले.  कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते मोळी टाकून, यंत्राची पूजा करून गाळपाचा प्रत्यक्षात शुभारंभ करण्यात आला. गेले दहा ते पंधरा दिवस पडणारा सततचा पाऊस, त्यामुळे बॉयलर पूजन करून व मोळी पूजन करून पावसाचा व्यत्यय आला

होता. परंतु ज्या ठिकाणी ऊस तोडून कारखान्यांमध्ये गाळपासाठी आणता येतोय, जिथे रस्त्याची चांगली सोय आहे. अशा ठिकाणचा ऊस कारखाना नियमाच्या अधीन राहून काल कारखान्यांमध्ये गाळपासाठी आणण्यास सुरुवात झाली. त्यामुळे श्रीपुर आणि परिसरामध्ये कारखान्याच्या ऊस वाहतूक वाहनांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे श्रीपुर परिसरातील अनेक उद्योग व्यवसायांना चालना मिळते. पांडुरंग कारखाना सुरू झाल्यामुळे अनेकांची सीझनमध्ये कामाची लगबग सुरू असते. छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. परिसरात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.

 देशपातळीवर आणि राज्य पातळीवर बक्षीस मिळवणारा, कै.सुधाकरपंत परिचारक, विद्यमान चेअरमन प्रशांतराव परिचारक, वा.चेअरमन वसंतनाना देशमुख, कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व सर्व संचालक, सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी यांच्या  अचूक व योग्य नियोजनाने हा कारखाना गेले अनेक वर्षापासून उत्तम प्रकारे सुरू आहे.चांगला दर देणारा कारखाना म्हणून सुद्धा याचा नामोल्लेख होतो.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget