श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा गाळप हंगाम विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार!





( मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापू) काशिनाथ धोत्रे यांच्या हस्ते गाळप हंगामास होणार सुरूवात)




सोलापूर // प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा सहकारी साखर कारखान्यावर अवलंबून आहे. अश्या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला सुरुवात होणार आहे. येत्या रविवारी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ह.भ.प. भागवत महाराज चवरे सह अन्य चार प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गाळप हंगामाचा शुभारंभ होणार आहे. 


 प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणींवर कारखान्याचे चेअरमन आ. भारत (नाना) भालके यांनी मात केली आहे. सभासद, शेतकरी, कामगारांच्या असलेल्या विश्वासाला त्यांनी तडा जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. 


येत्या रविवारी विजया दशमीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांचा मुहूर्त काढला असून जेष्ठ नेते,माजी नगराध्यक्ष प्रभाकर उर्फ बाबा अधटराव, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापू) काशिनाथ धोत्रे, शिवसेनेचे नेते संजय शिवलाल कोकाटे, यांच्यासह चांगदेव दत्तात्रय कदम (उंबरे पागे), माधव नारायण चव्हाण (सुस्ते) शिवाजी औदुंबर हुगे -पाटील,(शेगाव दुमाला) दशरथ रघुनाथ पाटील (शेळवे) राणुबा केरबा शिंदे (कान्हापुरी), नंदकुमार बाळकृष्णा पाटील (पट.कुरोली ता. पंढरपूर), नागनाथ तायाप्पा मोरे (चळे ता. पंढरपूर), उत्तम भगवत घाडगे (अजनसोंड ता.पंढरपूर), लक्ष्मण वामन पारेकर (बादलकोट ता.पंढरपूर), आप्पा नारायण पवार (खेडभोसे ता. पंढरपूर), कालिदास रघुनाथ पाटील (कवठाळी ता. पंढरपूर), नागनाथ मारुती गायकवाड (पोहोरगाव ता. पंढरपूर), भिमराव सदाशिव पवार (चिंचोलीभोसे ता. पंढरपूर), राजू देवराव दगडे (कोरोळे ता. पंढरपूर), बलभीम आप्पा घाडगे (मुंढेवाडी ता. पंढरपूर), मारुती राम पवार (खेडभाळवणी), तानाजी बाईची सावंत (आंबे ता .पंढरपूर), बाबासाहेब सदाशिव हाके (सोनके ता. पंढरपूर), दगडु दिगंबर भुसनर (होळे ता. पंढरपूर), बाळासाहेब वासुदेव लामकाने (पि.कुरोली ता.पंढरपूर),  शंभुदेव चंद्रसेन बाबर (पुळुज ता.पंढरपूर), या सर्व जेष्ठ सभासदांना मोळी टाकण्याचा मान मिळणार आहे.

या कार्यक्रमास शेतकरी सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्य. संचालक आर. एस. बोरावके यांनी केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget