भ्रष्टाचार निर्मूलन समितिच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राहुल गोयल यांची निवड.





सोलापूर प्रतिनिधी :– अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितिची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील-खंडापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्या बैठकीत महाराष्ट्रात समितीचे मजबूत संघटन करून त्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी समितीच्यावतीने नूतन प्रदेश कार्यकारिणी निवडण्यात आली.


या बैठकीत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितिच्या – महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल गोयल यांची निवड केल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रदीप पाटील-खंडापूरकर यांनी जाहीर केले. तसे निवडीचे पत्र संघटक बाळासाहेब फाळके यांच्या हस्ते राहुल गोयल यांना देण्यात आले. 


यावेळी बोलताना राहुल गोयल यांनी समितिचे कार्य सर्वदूर पोहचविण्यासाठी व विशेष करून पीडित वर्गांच्या न्याय हक्कासाठी काम करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले आणि संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget