कै. सातलिंगप्पा संगप्पा म्हेत्रे यांचे जन्म 21/11/1931साली दुधनी येथे गरीब शेतकरी कुटुंबात झाला असुन त्यांचे शिक्षण मराठीतून चौथी पर्यंत झाला, नंतर त्यांनी कुस्ती खेळण्यात जास्त आवड झाला आणि लहानपणापासून त्यांना मल्ल, पैलवान म्हणून ख्याती झाले तेव्हा दुधनी गाव तत्कालीन कुरूंदवाड संस्थानात होते व मैंदर्गी हे तालुक्याचे ठिकाण होते, म्हेत्रे यांचे कौटुंबिक जीवन सुखी, समाधान आणि समृद्धता आहे. म्हेत्रे साहेब यांचे लग्न वयाच्या 15व्या वर्षी झाले कसारशिरसी ता.निलंगा जि उस्मानाबाद येथील श्री अंबानी आण्णा माळी यांच्या कन्या लक्ष्मीबाई या धर्मपत्नी म्हणून कै.सातलिंगप्पा म्हेत्रे यांना साथ देऊ लागल्या, म्हेत्रे साहेबांचे पाच मुले व तीन मुली असा परिवार आहे, त्यापैकी प्रभावती ही थोरली मुलगी मंद्रुप ला ख्याडे यांच्या घराण्यात दिली दुसरी चंद्रकला यांना उमरगा तालुक्यातील येळी गावात पाटील घराण्यात दिली असुन तिसरी नागम्मा ह्या कसारशिरसी याठिकाणी वास्तव्यास आहेत. त्याच प्रमाणे श्री मल्लीनाथ म्हेत्रे, कै. शरणप्पा म्हेत्रे, कै. काशिनाथ म्हेत्रे, श्री सिध्दाराम म्हेत्रे माजी गृहराज्यमंत्री व श्री शंकर म्हेत्रे माजी दुधनी कृ. उ. बा समितीचे सभापती असे म्हेत्रे साहेबांचे परिवार आहे. म्हेत्रे साहेबांची 500 एकर जमीन आहे शेती हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय करतात, शेतीवर कसे प्रेम करावे हे शिकण्यासाठी अनेक जण त्यांच्या दुधनी येथील शेतात येतात तसेच शेतात अथवा घरी गेलेला माणूस न जेवता, चहा न घेता जाणार नाही याविषयी म्हेत्रे साहेबांचा कटाक्ष असतो. आपल्याकडे येणारा माणुस हा अतिथी आहे, "अतिथी देवो भव " हा संस्कार त्यांच्या रक्तात भिनलेला आहे.
म्हेत्रे साहेबांना लहानपणापासून समाजसेवेची आवड होती तत्कालीन कारण सन 1947 मध्ये भारत स्वातंञ्य झाल्यावर 1948 मध्ये हैद्राबाद संस्थानाच्या विलनीकरण प्रश्न उद्भवला आणि दुधनी गाव हे हैद्राबाद संस्थानाच्या सीमेवर होते मुक्तिसंग्राम चालू झाल्यावर निजामाची रझाकार संघटनांनी दुधनीच्या आजुबाजुच्या भागात येऊन दरारा व लुटमार करण्यास सुरुवात केली, तेव्हा लुटालुटीपासुन वाचविण्यासाठी लढा सुरू केले यावेळी निजाम सरकारने म्हेत्रे साहेबांवर अटक वाॅरंट जारी केले व या लढ्यात यशस्वी होऊन गावचे रक्षण व समाजसेवेची भावना म्हेत्रे साहेबांना निर्माण झाली व पुढे राजकारणात आवड निर्माण झाली.
कै. सातलिंगप्पा म्हेत्रे साहेब इ.स.1957 मध्ये श्री छन्नुसिंग चंदेले यांच्यासाठी काम केले, व दुधनी येथील श्री चन्नप्पा पडसुर हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यांच्या प्रेरणेने म्हेत्रे साहेबांनी काँग्रेसचे काम सुरू केले, सय्यद बाबा अली, छन्नुसिंग चंदेले, व शंकरप्पा लोकापुरे यांच्या सहकार्याने म्हेत्रे साहेब इ.स.1959 मध्ये नगराध्यक्ष झाले. तेव्हापासून कै. सातलिंगप्पा अण्णा म्हणून ओळखले जाणारे ते पुढे सातलिंगप्पा म्हेत्रे साहेब म्हणुन ख्याती झाले.
राजकीय वैभवामुळे म्हेत्रे साहेब हे 2 महिने 18 दिवस जेल मध्ये होते त्यांनी जेलमधुन उमेदवारी अर्ज भरले 12 वार्डापैकी 10 वार्डातुन त्यांचे उमेदवार व स्वतः निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांना जेलमधुन सोडण्यात आला. या कामी कै.शंकरराव मोहिते पाटील यांची मोलाची मदत झाली. दुधनी नगरपरिषदेच्या 1959 व 1974 सरळ लढती झाल्या त्यानंतरच्या कालखंडात बिनविरोध निवडी झाल्याआ1974 मध्ये अक्कलकोट मार्केट कमिटी सभापती म्हणून निवड झाली व 1981 पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य उत्कृष्टपणे त्यांनी केले आहे. 1967मध्ये कै. शंकरराव मोहिते पाटील यांनी म्हेत्रे साहेबांना आमदारकीचे तिकिट द्यावयास लावतो असे म्हणाले असता म्हेत्रे साहेब यांनी नम्रपणे नाकारले आणि इतरांना साथ दिली.
सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय जीवनात एकदाही पक्ष न बदलणारे एकमेव नेतृत्व म्हणजे कै. सातलिंगप्पा म्हेत्रे होत.
म्हेत्रे साहेबांचा राजकीय कारकीर्दीचा अभ्यास केला असता अल्प समाज असताना, भाऊबंधकी नसताना, आर्थिक पाठबळ नसताना व राजकीय पार्श्वभूमीवर 1958 ते 2013 असे सलग 54वर्षे दुधनी नगरपरिषदेवर एक हाती सत्ता टिकवून ठेवणारे भारतातील एकमेव नेता असावा असे माझे मत आहे. आज बारामती म्हंटले की शरद पवार, अकलूज म्हंटले की मोहिते-पाटील, आणि अक्कलकोट म्हंटले की कै. सातलिंगप्पा म्हेत्रे साहेब होय. अशा या स्वातंत्र्य सैनिक, तालुक्याचे भीष्मपितामहा म्हणून ओळखले जाणारे कै. सातलिंगप्पा संगप्पा म्हेत्रे साहेब यांचे वयाच्या 89 व्या वर्षी दि 2 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 8 च्या सुमारास त्यांच्या जिवनाची अखेरचा श्वास सोडली. अश्या महान व्यक्तिमत्वास पञकार विरभद्र पोतदार कडुन "भावपुर्ण श्रध्दांजली"

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.