जिल्हा परिषद शाळेत स्वाध्याय पुस्तिकेचे सर्व विद्यार्थ्यांना वितरण.






वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

ऑनलाईन शिक्षणात येत असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी, तसेच स्मार्ट फोन नसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळुज, ता पंढरपूर जि सोलापूर या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने स्वाध्याय पुस्तिका तयार केल्या आहेत.  त्या स्वाध्यायपुस्तिका चे आज शाळेत वितरण करण्यात आले. नवीन पुस्तिका हातात आल्यावर विद्यार्थी व पालकांना अतिशय आनंद झाला. 


त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांना स्व हरिश्चंद्र फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे व्यक्तींना व संस्थांना देण्यात येणारे स्नेहबंध समाजरत्न सन्मान मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळुज या शाळेचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पुळूज केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ब्रम्हदेव घाडगे साहेब यांचे हस्ते सत्कारमुर्ती श्री दत्तात्रय पांढरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षक सिद्धेश्वर भुई सर यांनी अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांच्या कार्याची थोरवी सांगताना भुई सर म्हणाले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा "पुळुज येथे मागील दोन वर्षापासून व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलत विविध उपक्रमांचे आयोजन करत श्री दत्तात्रय पांढरे यांनी शाळेसाठी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी जमा केली. तसेच शाळेच्या विविध भौतिक व शैक्षणिक समस्या जाणून घेऊन त्या विविध मार्गांनी व अथक प्रयत्न करून सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. बांधकाम समिती सभापती विजयराजजी डोंगरे यांच्या निधीतून २.५ लाख रूपये व पाचव्या वित्त आयोगाचे २ लाख रूपये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळवण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले.  तसेच पुळुज येथील अहिल्याबाई होळकर मित्र मंडळाच्या खजिनदार पदाची जबाबदारी काही काळ त्यांनी यथार्थपणे सांभाळली आहे. त्याचबरोबर कोरोना काळात गरजवंताला धान्य वाटप, मास्क व सॅनिटायझरचे वाटप त्यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्य वाटप केले. रक्तदान शिबिर आयोजित करून स्वतः रक्तदान करून इतरांना प्रेरणा देत रक्तदान करण्यास प्रवृत्त केले. असे विविध सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली."

 त्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व पालकांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले व अशीच उत्तरोत्तर दत्तात्रय पांढरे यांची प्रगती होवो व असेच विविधांगी सामाजिक कार्य त्यांच्या हस्ते घडून येवो ही सदिच्छा सर्व शिक्षक वृंद यांनी व्यक्त केली. यावेळी पंढरपुर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन खरात, किसन जाधव,  ग्रामसेवक आर पी कोळी, लक्ष्मण धनवे, उपसरपंच मधुकर बाबर,प्रमोद बाबर, चेअरमन तुकाराम तेरवे, पुळुज ग्रामपंचायत सदस्य लिगादेव निळगुंडे, विनायक पाटील, विश्वास पांढरे, दिलावर मुलाणी,  भारत पांढरे,आणा कुभांर, जुबेर मुलाणी, बाळू शिंदे, अमर मुलाणी, राजु माने, पोपट म्हमाणे, सतिश गोरे, नवनाथ गोरे, पांडुरंग म्हमाणे, सतिश चव्हाण, आदी मान्यवर व शिक्षक सिद्धेश्वर भुई, विठ्ठलराव टाकळे, सागर सोनवले सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन निरगिडे सर यांनी केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget