सर्व जेष्ठ ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते उद्या होणार "पांडुरंग सहकारी साखर" कारखान्याचा २९ वा बाॅयलर अग्नी प्रदीपन समारंभ.







सोलापूर // प्रतिनिधी 

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाना मधील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून गणल्या गेलेल्या श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा एकोणतिसावा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १० वाजता. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी मा.आ.कै सुधाकरपंत परिचारक यांचे जुने सहकारी व कारखान्याचे ज्येष्ठ सभासद,


यामध्ये लक्ष्मण सोपान डुबल ( अजनसोंड ), ज्ञानोबा राजाराम शिंदे ( रांझनी ), वसंत बाबुराव चव्हाण ( बाभूळगाव ), शिवाजी दत्तात्रय देशमुख ( कासेगाव ), जोतिराम रामचंद्र चव्हाण ( बाभूळगाव ), दादा नारायण यलमार ( सुपली ), धोंडीराम घनश्याम पाटील ( आव्हे ), अनंत दिगंबर राजोपाध्ये ( रांजनी ), संदीपान भीमराव वाडेकर ( शिरगाव ), शामराव सखाराम लोखंडे ( भंडीशेगाव ), सीताराम ज्ञानोबा बागल ( गादेगाव ), आबासो जयवंत गायकवाड ( चिंचोली भोसे ) यांच्या शुभहस्ते . कारखाना कार्यस्थळी आयोजित करण्यात आला आहे.



तसेच सकाळी ठीक आठ वाजता सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक परमेश्वर बजरंग गणगे व त्यांच्या पत्नीच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

अशी माहिती कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ.यशंवतराव कुलकर्णी यांनी सांगितले.

तरी या कार्यक्रमासाठी सर्व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना व पांडुरंग परिवार प्रेम करणाऱ्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे व्हा चेअरमन वसंतनाना देशमुख यांनी केले आहे.


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget