एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची मुंबईत भेट होण्याची चर्चा






वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. लवकरच मोठा निर्णय घेऊ असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बातमी समोर आली होती. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चाही झाल्याचं म्हटलं जात होता. हा बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर ही भेट झालीच तर यानंतर काय होणार याची उत्सुकता आहे.  पाटील 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात...

दरम्यान ही भेट कधी होणार याची वेळ निश्चित झाली नसली तरी ही भेट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार आपल्या दैनंदिन कामकाजासाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ खडसे सध्या त्यांच्या चर्चगेट इथल्या निवासस्थानी आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांच्याकडे विचारणा केली असता, मी एकनाथ खडसे आहे, लपूनछपून कोणत्याही गोष्टी करत नाही असं बोलून प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट होणार नाही, अशी शक्यताही नाकारली नाही.

शरद पवार यांच्या नेतृत्त्वात जळगावमधील स्थानिक नेत्यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. त्यात खडसेंच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार होता. परंतु राष्ट्रवादीने यासंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. गाठीभेटींचा सिलसिला सुरु आहे. चर्चेचं गुऱ्हाळ सुरु आहे. त्यामुळे आज जर दोन्ही नेत्यांची भेट झाली तर त्यामध्ये काय निर्णय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget