शेतीला आधुनिक व्यवसायाची जोड द्या:- प्रा. संग्राम चव्हाण




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

टाकळी सिकंदर येथील शिवाजी चौक याठिकाणी येथील युवा उद्योजक श्री अमोल साहेबराव चव्हाण यांनी सुरू केलेल्या श्री स्वामी समर्थ  या ऑटोमोबाईल स्पेअर पार्टस विक्री व दुरुस्ती वर्कशॉप या नूतन व्यवसायाचे उद्घाटन माननीय प्रा संग्रामदादा चव्हाण नूतन जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना व श्री अमोल चव्हाण यांना त्यांच्या व्यवसायातील पुढील वाटचालीस व प्रगतीस शुभेच्छा देताना प्रा. संग्राम चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी आज फक्त शेतीवर अवलंबून न राहता पारंपरिक शेतीला कुठल्यातरी आधुनिक व्यवसायाची जोड देणे ही काळाची गरज बनलेली असून प्रत्येक शेतकरी कुटुंबातील एका तरी मुलाने शेतीपूरक व्यवसायासह इतर व्यवसायही केले पाहिजे की ज्यामुळे त्यांच्याकडे दररोज चालू चलन येत राहील आणि त्यांची हळूहळू चांगली प्रगती होईल नुसत्या शेतीवर अवलंबून राहणे हा खूप मोठा जुगार असून त्यामुळे ते कुटुंब आर्थिक दृष्ट्या संकटात जाऊ शकते या बाबीवर भर दिला.शेतकऱ्यांच्या मुलांच्या अंगी उद्यमशीलता व व्यावसायिक दृष्टिकोन बाणला गेला पाहिजे तरच या स्पर्धामय जगामध्ये त्याचा टिकाव लागू शकेल या गोष्टीकडे पण लक्ष वेधून घेतले. यावेळेला उपस्थित मान्यवरांमध्ये राशिदअली शेख, दत्तात्रय चव्हाण साहेबराव चव्हाण,किसन भाऊ चव्हाण, दीपक चव्हाण, बंडोपंत यादव श्री व्यवहारे, अभिजीत चव्हाण ,भाऊसाहेब चव्हाण, सागर चव्हाण विनोद यादव, दामू यादव उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget