खा.धनंजय महाडिक यांची कै.राजूबापू पाटील,परिचारक व कै.चरणूकाका पाटील कुटुंबियांना सांत्वनपर भेट.






सोलापूर // प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाने दुःखद निधन झालेले पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा स्व.आ. सुधाकरपंत परिचारक,व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य स्व. राजूबापु पाटील व दामाजी कारखान्याचे चेअरमन ज्येष्ठ नेते स्व.चरणु काका पाटील, यांच्या निवासस्थानी आज भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी पहिल्यांदा पंढरपूर तालुक्यातील भोसे (क) येथील स्व. राजूबापू पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली यावेळी त्यांनी त्यांचे बंधू शेखर (भैय्या) पाटील यांची विचारपूस केली.



 त्यानंतर त्यांनी पंढरपूर येथील कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या वाड्यावर भेट दिली यावेळी सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आ. प्रशांतराव परिचारक, युटोपियन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक हे सर्व उपस्थित होते यावेळी त्यांनी परिचारक कुटुंबांची चौकशी करून त्यांचे सांत्वन केले.




 त्यानंतर त्यांनी ब्रह्मपुरी येथील  येथील स्व. चरणू काका पाटील, यांच्या निवासस्थानी भेट दिली. यानंतर कै.भीमराव (दादा)महाडिक यांचे सहकारी व मित्र कै.सर्जेराव (तात्या) पाटील,पैलवान कै.शिवाजी(तात्या) पाटील त्यानंतर विनोद (भैय्या) महाडिक यांचे सासु,सासरे चव्हाण कुटुंबियांचा पंढरपूर येथील निवासस्थानी ही खासदार धनंजय महाडिक यांनी भेट दिली. या भेटीप्रसंगी संजय पाटील, राजू पाटील दत्तात्रय पाटील हे ब्रह्मपुरी येथील निवासस्थानी उपस्थित होते. मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डीचे स्व.गुरुनाथ आसबे यांच्या निवासस्थानी सुद्धा मा. खा धनंजय महाडिक यांनी सांत्वनपर भेट दिली.




 यासर्व भेटीच्या दरम्यान त्यांच्यासमवेत भीमा परिवाराचे शिवाजीराव गुंड पाटील,सोलापूर जिल्हा किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष  प्रा. संग्राम चव्हाण सर, मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण माणिक बाबर, बंडू बाबर, राजाराम बाबर, बंडू शेख,भारत पाटिल, नानासाहेब जगताप, संदीप जमदाडे, राष्ट्रवादी काँग्रेसची पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले, यशवंत (बंडू) चव्हाण, युवराज भोसले, संतोष पवार, आधी सर्व कार्यकर्ते या भेटीप्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget