वृत्तसंस्था // प्रतिनिधी
परतीच्या पावसामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. माळशिरस तालुक्यातील इतर इन्शुरन्स संस्था दूध डेअरी मार्फत इन्शुरन्स घेत आहेत. पण युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ही दुध डेअरी मार्फत कोणत्याही प्रकारे इन्शुरन्स काढत नाहीत. तसेच शेतकऱ्यांना हीन वागणूक देऊन अरेरावीची भाषा वापरत आहेत.
तरी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांबद्दल ही वागणूक खपवून घेतली जाणार नाही. लवकरात लवकर दू
ध डेअरी संस्थे मार्फत विमा उतरवण्यास चालू करावे.अन्यथा आपल्या इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात तीव्र स्वरूपाची आंदोलने छेडण्याचा इशारा युवासेनेचेच्या वतीने देण्यात आला आहे.अशा प्रकारचे निवेदन युवासेना अकलूज शहराच्या वतीने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे डी.एम कांबळे यांना देण्यात आले त्यावेळी युवासेना शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे,शेतकरी संघटनेचे आतार साहेब, अजिंक्य पासगे,साहिल आतार, तेजस भाकरे,प्रवीण कोळेकर हे उपस्थित होते तरी डी.एम कांबळे यांनी विमा लवकरच उतरवायला सुरवात करण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.