विजयादशमीच्या मुहूर्तावर गडकिल्ले स्वच्छतेचा निश्चय शिवसुष्टीपासुन तोरण बांधून सुरुवात
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात रयत राजा होऊन सुखाने नांदली.आजचा दसरा असेल दिपावली असेल.असे महाराष्ट्रात होणारे प्रत्येक सण असतील ते उत्साहाने साजरे होत आहेत त्या मागे छत्रपती शिवरायांच्या संघर्षाची आणि हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढलेल्या प्रत्येक मावळ्यांच्या बलिदानाची देण आहे. हा प्रत्येक गडकोट महाराजांच्या इतिहासाची साक्ष देत आहेत.महाराष्ट्रामध्ये दसरा या दिवशी आपल्या दाराला शुभ तोरण बांधुन लढाईला निघण्याची तयारी करायची परंपरा आहे.पण ज्या गडकोटांमुळे आपल्या घराला घरपण मिळाले. आदी त्या स्वराज्याच्या म्हणजे च गडकोटांच्या दारी हे शुभ तोरण बांधणे हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आज आम्ही आमच्या गावाचा अकलूजचा भोईकोट शिवसृष्टी किल्ला व माळसिरस येथील ऐतिहासिक शिवरायांची कन्या सखुबाई निंबाळकर यांचे स्मारक या ठिकाणी विजयादशमी निमित्ताने तोरण बांधून या शुभ मुहूर्तापासून महाराष्ट्रातील गटकोट किल्ले संवर्धन मोहिमेला सुरवात करत आहोत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.