टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा 41 वा बॉयलर प्रदीपन सोहळा व व गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना साहेब महाडिक व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अरुंधती महाडिक या उभयतांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कारखान्याचे संचालक सिद्राम मदने व व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते अग्नी प्रज्वलित करून पार पडला तसेच कारखान्याचे ज्येष्ठ सभासद निवृत्ती बापू तांदळे संभाजी सदाशिव माळी नारायण भिमराव गायकवाड हरिभाऊ काकडे बाबुराव पाटील यांच्या हस्ते गव्हाणी मधे मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला
यावेळी भीमा कारखान्याच्या सभासदांशी संवाद साधताना कारखान्याचे चेअरमन खा धनंजय महाडिक म्हणाले की गेल्या नऊ वर्षांमध्ये दुष्काळी परिस्थिती उसाची कमतरता यामुळे दोनच सीझन पूर्ण क्षमतेने गाळप झाले इतर सात हंगाम कधी अपूर्ण तर कधी बंद असे गेले त्यामुळे कारखान्याला आर्थिक कोंडीला सामोरं जावं लागलं यात काळामध्ये आपण विस्तारीकरण प्रकल्प व सह वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण केला पूर्ण केला त्याचा अतिरिक्त व्याजाचा बोजा कारखान्यावर पडला परिणामी कामगारांचे वेतन व शेवटच्या टप्प्यातील काही ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांची ऊस बिले एफआरपीप्रमाणे थकली गेल्या आठ महिन्यापासून आम्ही कर्ज निधीसाठी प्रयत्नशील होतो अखेर माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय अर्थमंत्री जयंत पाटील साहेब माननीय अजितदादा पवार व व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्ज थकहमी मंजूर करून आपला आर्थिक प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल या सर्वांचे मी आपणा सर्वांच्या वतीने मनस्वी आभार मानतो.
यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे उसाचे उत्पादन वाढले असून कारखान्याकडे सुमारे 14 लाख टन उसाची नोंद झाली आहे.यंदा आपण दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवत आहोत .1 नोव्हेंबर पासून कारखाना गाळपासाठी सज्ज होत आहे यंदा सह- वीज निर्मिती प्रकल्पांमधून 40 कोटी रुपयाचे ज्यादा उत्पन्न मिळणार असून कारखान्यात समोरील आर्थिक प्रश्न संपणार आहेत. सभासदांनी आपला दर्जेदार ऊस आपल्याच कारखान्याला गाळपासाठी पाठवून कारखान्याला सहकार्य करावे. भिमाच्या वजन काट्यावर आपला विश्वास आहेच. येत्या तीन वर्षात आम्ही आपला कारखाना कर्जमुक्त करून दाखवू
भीमा कारखान्याचे सभासद व कामगार हे भीमा रथाची दोन चाके असून कारखान्यांपुढे निर्माण झालेली आर्थिक कोंडी माझ्या सभासदांनी समजून घेऊन आम्हाला सहकार्य केले परंतु काही राजकीय हेतूंनी प्रेरित कामगार प्रतिनिधी भिमाच्या कामगारांची दिशाभूल केली. कारखान्या समोरील आर्थिक कोंडी केंद्र किंवा राज्य सरकारच्या मदतीशिवाय संपू शकत नाही शकत नाही याची पूर्ण जाणीव असूनही आंदोलन छेडले त्यामध्ये बँक पातळीवर संस्थेची बदनामी झाली. आर्थिक मदत मिळण्यासाठी उशीर होत गेला कामगारांच्या आंदोलनाचा उपयोग तर काहीच झाला नाही पण उलट विलंबामुळे कारखान्याच्या कामगारांना जास्त अडचणींना सामोरे जावे लागले .त्याबद्दल मला मनस्वी दुःख आहे" यावेळी श्री महाडिक भाऊक होताना दिसले ते पुढे म्हणाले "ज्या कामगारांना संस्थेच्या हिताविषयी आत्मीयता आस्था प्रेम नाही व ज्यांनी संचालक मंडळ चेअरमन यांच्याविषयी अर्वाच्च भाषा वापरली त्यांनी स्वतःहून राजीनामा देऊन निघून जावे त्यांच्या शुल्लक राजकीय स्वार्थापोटी माझ्या इतर कामगारांचे नुकसान होते भीमा कारखाना ही सभासदांची लक्ष्मी असून याबाबत जर कोणी विषारी राजकारण करत असेल तर ते कदापि खपवून घेणार नाही.
कारखाना 1 नोव्हेंबर पासून सुरू करत असून शेतकऱ्यांची एफआरपीप्रमाणे थकीत बिले दिवाळीपूर्वी दादा करत असल्याचे व व कामगारांच्या थकित पगार सात महिन्यांचा पगार देऊन सिव्हिल मधील सर्व कामगारांना पदोन्नती देण्यात येईल असे यावेळी बोलताना श्री महाडिक म्हणाले
या शुभप्रसंगी श्री महाडिक यांचे तीन चिरंजीव पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक व विश्वराज महाडिक उपस्थित होते. तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, शिवाजीराव गुंड पाटील, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा संग्राम चव्हाण, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, शिवसेनेच्या जि प सदस्य शैलाताई गोडसे, सुरेश सावंत, हिंमत पाटील, सजन पवार, जयंत पवार, उत्तम मुळे, कालिदास, पाटील, बाळासाहेब पवार, सिद्धेश्वर पवार, माणिक बाबर, राजाराम बाबर, धनंजय बाबासाहेब देशमुख, शिवाजी शेंडगे, महादेव देठे,प्रमोद बाबर, नाना पवार, विक्रम डोंगरे, बंडू शेख, अन्सार शेख, माऊली जाधव सर,दत्तात्रय सावंत, विठ्ठल पुजारी, संजय यादव,नारायण जाधव,गणपत पुदे, दादासो शिंदे, बापु चव्हाण, बापु जाधव, दिलीप रणदिवे,अनिल गवळी, अंकुश गवळी, सुरेश टेकळे, भारत पाटील,उत्तम मुळे, संदिप जमदाडे,भगवान बाबर, दत्तात्रय पाटील, अशोक पवार, भाऊसाहेब जगताप,शेती अधिकारी एम.ए.पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग ताटे तर आभार प्रदर्शन सतीश जगताप यांनी केले.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.