पंढरपूर तालुक्यात गाव तिथं शाखा गाव तिथं प्रहार ला सुरुवात पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रहारमध्ये प्रवेश:- दत्ताभाऊ मस्के



सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील रांझणी या गावातील  दि,25/10/2020 रोजी शेकडो युवकांच्या सह अनेकांचा प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये प्रवेश .झाला असुन सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून वंदनीय बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे काम अतिशय उत्तम रित्या चालू असून संपूर्ण महाराष्ट्राच्या आयडॉल म्हणून बच्चुभाऊ कडे पाहिले जात आहे त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील गेल्या चार वर्षापासून प्रहार संघटनेचे जाळे खेड्यापासून शहरापर्यंत पसरत असल्याचे दिसत आहे.अनेक युवक भाऊंच्या विचाराने प्रेरित होऊन सोलापूर जिल्ह्यात प्रहार'मध्ये प्रवेश केला आहे. दिनांक  25/10/2020 रोजी पंढरपूर तालुक्यात आप्पासो खडतरे यांच्यासह अनेक तरुण युवक वृद्धांनी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाप्रमुख संतोष मोरे व नानासाहेब इंगळे यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती व शेतकरी संघटनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील म्हणाले बच्चु भाऊंच्या विचारावर व सर्व समाजातील सर्व दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन,काही दिवसातच पंढरपूर तालुक्यात गाव तिथे शाखा ओपनिंग करून बच्चुभाऊ यांचा सेवा त्याग समर्पण संघर्ष हा विचार घराघरात पोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करून समाजातील दुर्लक्षित घटकांची सेवा हीच पुण्याई म्हणून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.

 यावेळी प्रहारचे युवा जिल्हाप्रमुख प्राध्यापक संतोष पवार पंढरपूर तालुका प्रमुख संतोष मोरे युवा तालुकाप्रमुख नानासाहेब इंगळे करमाळ्याचे तालुकाप्रमुख संदीप तळेकर मंगळवेढा शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख सचिन गरंडे,बापू मोहिते, संजय अवघडे यांच्यासह सुदाम मोरे , निखील खिलारे रांझणी येथील गणेश अवताडे, गणेश भाकरे, रवि दांडगे, आबा शिंदे, बालाजी शिंदे, औदुंबर भाकरे, अतुल मोरे यांच्यासह अनेक तरुण गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget