आठवलेंचा पक्ष देणार हाथरसच्या पीडित कुटुंबीयांना संरक्षण




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेनुसार पुढे ढकलण्यात आलेली हाथरसच्या पीडित दलित मुलीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (ता. 6 ऑक्‍टोबर) घेतली. पीडित मुलीच्या बुलगडी या गावातील घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांचे आठवले यांनी सांत्वन केले.   आठवले हे दोन ऑक्‍टोबर रोजी हाथरस येथे जाणार होते. मात्र, तेथील जिल्हा प्रशासनाने सर्व पक्षाच्या नेत्यांना प्रवेशबंदी केली होती. प्रशासनाच्या विनंतीमुळे आठवलेंनी आपला दौरा बदलून लखनौ येथे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली होती. त्यानंतर आठवले मुंबईत परतले होते.त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आठवले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता. त्यांच्यात झालेल्या चर्चेनुसार आठवले यांनी आज हाथरसचा दौरा केला. या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष संरक्षण देणार आहे. त्याच्याबरोबरच आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगून या परिवाराला पोलिस संरक्षण देणार असल्याचे आठवले यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आठवलेंना दूरध्वनी करून हाथरस प्रकरणी चर्चा केली होती. पीडित दलित युवतीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देऊन तिला न्याय मिळवून देऊ. तिच्या कुटुंबीयांना शहरात चांगले घर देऊ. कुटुंबातील एकास शासकीय नोकरी देणार, 25 लाख रुपये सांत्वनपर निधी देणार तसेच या प्रकारणाची सीबीआयद्वारे चौकशी करणार त्याचप्रमाणे या प्रकरणी कर्तव्यात कसूर करणारे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकारी निलंबित करण्यात आल्याची माहिती आदित्यनाथ यांनी दिल्याचे आठवले यांच्याकडून सांगण्यात आले होते. 


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget