१५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरु होणार; जाणून घ्या काय आहेत नियम आणि अटी

 


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

केंद्र सरकारनं देशभरात चित्रपटगृहं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहं सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. "गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबरपासून देशात चित्रपटगृहं, मल्टीप्लेक्स सुरू होणार आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे आणि ५० टक्के क्षमतेनं त्यांना परवानगी देण्यात आली आहे," असं जावडेकर म्हणाले.


"चित्रपटापूर्वी करोना संदर्भात जनजागृती करणारी एका मिनिटांची शॉर्ट फिल्म अथवा एक घोषणा करणं अनिवार्य आहे.


तसंच ऑनलाइन तिकिट आरक्षित करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे," अशी माहितीही जावडेकर यांनी दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपासून देशभरात ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिल्यानं गेले सहा महिने बंद असलेल्या चित्रपटगृहांना आशेचा किरण दिसू लागला आहे, निर्णय देशातील त्या त्या राज्यांवर अवलंबून आहे. जर राज्यांनी चित्रपटगृह सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास आणि ती सुरू झाल्यास तरच दसरा-दिवाळीत उत्पन्न घेता येईल, असं चित्रपटगृह मालकांकडून सांगितलं जात आहे.


३००० हजार कोटींचं नुकसान


गेल्या सहा महिन्यांत चित्रपटगृहे बंद असल्याने देशभरातील चित्रपटगृह व्यवसायाचे तब्बल ३००० कोटींचं नुकसान झालं आहे. यात केवळ हिंदी चित्रपटांचे २००० कोटींचं नुकसान झालं आहे. हे नुकसान दोन महिन्यांत भरून येणे शक्य नाही, मात्र दसरा आणि दिवाळी हा मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात सगळीकडेच व्यवसायाच्या दृष्टीने सुवर्णकाळ मानला जातो. या महिन्यांत सगळीकडे चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी मिळाली तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत चित्रपटगृह मालकांना व्यवसायाची घडी बसवण्यासाठी मदत होईल, असे मत 'सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एक्झिबिशन असोसिएशन ऑफ इंडिया'चं अध्यक्ष नितीन दातार यांनी यापूर्वी व्यक्त केलं होतं.


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget