पंढरपूर प्रतिनिधी : - पुण्यासह राज्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला आढावा. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे व बचाव, मदतकार्य तत्परतेने करण्याचे दिले निर्देश.
कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान, त्याचे पंचनामे तात्काळ सुरु करण्याचे आणि पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.