नगरपालिकेच्या आवाहनाप्रमाणे त्वरित स्थलांतर करावे:विवेक परदेशी आरोग्य सभापती

 

        



 पंढरपूर प्रतिनिधी :- अतिरिक्त पर्जन्यमानामुळे चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढत असुन, गत वर्षीची पुर परिस्थिती प्रमाने पाणी गावात येण्याची शक्यता आहे. नगरपालिकेने केलेल्या  आवाहनानुसार कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता त्वरीत स्थलांतर करावे.

           नदीच्या पाणीपातळी बद्दल प्रशासनाच्या , नगरपालिकेचे वतीने वरचेवर माहीती देण्यात येत आहे. इतर मार्गातुन येणाऱ्या माहीतीवर, अफवेवर विश्वास ठेऊ नका.कोणतीही शंका मनात असल्यास नगरपरिषद प्रशासनास संपर्क साधावा. प्रत्येक भागात नगरपालिकेचे , प्रशासनाचे प्रतीनिधी कार्यरत आहेत.

         


 पावसाला थांबवणे आपल्या हातात नाही, पण येणाऱ्या परिस्थितीचा सामना आपण सर्वजण मिळून करावयाचा आहे. नागरिक प्रशासन मिळुन आपण कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. बऱ्या पैकी कोरोना पेशंट वाढ कमी होत आहे तरी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. उजनी धरणातुन पाण्या विर्सग थोडेसे कमी करण्यात आले आहे. आज दुपारी १,५०,००० क्यसेस पाणी सोडत असल्याचे समजले. आज वाढत चाललेली पाणी पातळीत उद्या घट होईल अशी माहीत मिळत आहे. तरी नागरिकांनी सर्तक रहावे. प्रशासनाच्या सुचनेकडे लक्ष द्यावे हि नम्र विनंती. नागरिक प्रशासन मिळुन आपण या संकट काळातुन आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करु.

 विवेक परदेशी

आरोग्य समिती सभापती

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget