सोलापुर ग्रामीण नुतन पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगोला पोलिस स्टेशनच्या कामकाजाचा घेतला आढावा


सोलापूर // प्रतिनिधी 

प्रथम गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यापेक्षा जी गुन्हेगारी होत आहे. त्याचे शंभर टक्के रजिस्ट्रेशन करुन, जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर ती योग्य तो प्रकारचा वचक बसवून मग गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न राहील, कोणत्याही पध्दतिच्या अवैध धंद्यांना जिल्ह्यामध्ये व तालुक्यात कुठेही थारा दिला जाणार नाही. जिल्ह्यात आणी तालुक्यात अवैध धंदे व गुन्हेगारी मुक्त वातावरण ठेवण्यासाठी तसेच महिलांसाठी सुरक्षित वातावरण, त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी मी व माझी संपूर्ण टीम काम करणार असल्याचा विश्वास सोलापुर ग्रामीणच्या नुतन सोलापुर ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला.

सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला भेटी देवून समस्या व अडीअडचणी जाणून घेत, कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे. त्यानिमीत्ताने काल गुरुवार दि. 15 ऑक्टोबर रोजी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगोला पोलिस स्टेशनला भेट देवून गुन्हेगारी, रिक्त पदे, यासह इतर कामकाजाचा आढावा घेत, अडी अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पो.नि. राजेश गवळी आदी उपस्थित होते.



सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सोलापुर जिल्ह्यात ग्रामीणचा दौरा सुरू आहे. याच दौऱ्याच्या अनुषंगाने सांगोला पोलीस स्टेशनला भेट दिली आहे. या भेटी मधून सांगोल्यातील बेसिक प्रॉब्लेम, गुन्हेगारी, अधिकारी-कर्मचारी यांच्याबाबतीत संख्या त्याचबरोबर सांगोल्यातील सध्याची परिस्थिती याबाबत माहिती घेत कामकाजाचा आढावाही घेतला आहे. या भेटीनंतर पुढील महिन्यात सांगोला भेट होणार आहे. परंतु चार्ज घेतल्यानंतर सर्व पोलीस स्टेशनला भेट घेणे या उद्देशाने सांगोल्याला भेट दिली आहे. कोणत्याही पध्दतिच्या अवैध धंद्यांना जिल्ह्यामध्ये कुठेही थारा दिला जाऊ नये यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम कार्यरत असणार आहोत. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यापेक्षा सुद्धा जी गुन्हेगारी होत आहे. त्याचे शंभर टक्के रजिस्ट्रेशन होण आणि मग ते गुन्हेगार आहेत त्यांच्यावर ती योग्यता प्रकारचा वचक बसवून मग गुन्हेगारी कमी करण्यासाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न राहतील आणि सोलापूर जिल्ह्यात अवैध धंदे व गुन्हेगारी मुक्त वातावरण ठेवण्यासाठी तसेच महिलांसाठी सुरक्षित वातावरण राहावे त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी संपूर्ण टीम काम करणार असल्याचा विश्वास देत, सांगोला पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी पदा संदर्भात बोलताना पोलिस अधिक्षक सातपुते मडम म्हणाल्या, पोलिस दलामध्ये महिला पोलिस कर्मचारी यांची संख्या कमी आहे.परंतू आता ज्या बदल्या होणार आहेत. त्यामध्ये प्राधान्याने महिलांवरील सर्वाधिक गुन्हे आहेत.त्या ठिकाणी माहिला अधिकारी यांची नियुक्ती करुन घेण्याबाबत करु. सांगोला पोलिस स्टेशनचे विभागणी करुन जुनोनी पोलिस सटेशन सुरु करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याबाबत पत्रकार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाल्या, जिल्ह्यातील जिल्ह्यातून बरेच प्रस्ताव गेलेले आहेत. त्यामध्ये सांगोला तालुक्यातील प्रस्तावाला मंजुरी मिळवून देण्यासाठी देखील पाठपुरावा करु तसेच अधिक मन पावर काशी उपलब्ध करता येईल यासाठी व पोलिस स्टेशन सक्षम करण्यासाठी प्रयत्न करु असेही पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

घरगुती आणि साध्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करावा. कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली जाणार नाही. नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी तालुकास्तरीय पोलीस अधिकारी यांच्याकडून जनजागृती सुरू केली आहे. अत्यंत साध्या पद्धतीने नवरात्र साजरा करावा. शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. कोरोना विषाणू पासून सुरक्षित राहण्यासाठी जबाबदार नागरिक या नात्याने आपणच आपली जबाबदारी पार पाडावी.

 तेजस्वीनी सातपुते

पोलिस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget