संपुर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने व पुराच्या पाण्याने थैमान घातले आहे.त्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.तरी शासनाने आता पंचनामे न करता शेतकऱ्यांची संपुर्ण कर्ज व शेतीचेविज बिल माफ करावे .अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची ना.बच्चुभाउ कडु यांच्या नेतृत्वाखाली आरपारची लढाई असेल असे वक्तव्य प्रहार संघटनेचे ता.प्रमुख संतोष मोरे यांनी व्यक्त केले आहे.शेतकरी एक तर गेली आठ महिन्या पासुन कोरोनामुळे व लाॕकडाऊन हैराण झाला आहे.शेतकरी आता आत्महत्या करणार नाहि तर शासनाच्या धोरणाला आत्महत्या करण्यास भाग पाडेल.विज,पाणी याच्यावर मात करीत कर्ज घेऊन जोमाने आणलेल्या पिकाला काडीमोल किंमत येते.तर निसर्गाच्या उद्रेकामुळे शेतकरी संपुष्टात येतो.म्हणून आता पंचना नको.व नियम व अटी लावुन कर्ज माफी न करता संपुर्ण ७/१२ उतारा कोरा शासनाने केला पाहिजे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.