अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देणेसाठी जिल्हाधिका-यांकडे केली मागणी –आ.बबनराव शिंदे






माढा मतदारसंघातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे पिकांचे नुकसान झालेले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देणेबाबत आ.बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांचेकड़े मागणी केली आहे.

माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या कालच्या प्रचंड वादळी वारा व पाऊस यामुळे हजारो एकर ऊस, केळीच्या बागा, डाळींब व फळबागा भुईसपाट झाल्यामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ओढे, नाले भरून शेती वाहून गेलेली आहे तसेच अनेकांचे घरामध्ये पाणी शिरून अतोनात नुकसान झालेले आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आलेला असून आता आसमानी संकाटमुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे.

अतिवृष्टीमुळे माढा मतदारसंघातील पंढरपूर, माळशिसर,माढा भागातील शेतक-यांचे शेतीचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान तसेच भिमा नदीकाठावरील व सिना नदीकाठावरील गावे महापुराने बाधित होवून त्या ठिकाणचे घरांची झालेली पडझड, दगावलेली अथवा पुरामध्ये वाहून गेलेली असंख्य जनावरे असतील अशा सर्व नुकसानग्रस्त शेतक-यांचे, गोरगरींबाचे तातडीने पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळणेसाठी सोलापूरचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांचेकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर तसेच प्रांताधिकारी व तहसिलदार यांना फोनवरून व पत्राद्वारे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करणेबाबत सुचना देणेत आल्या आहेत अशी माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget