महिला बचतगट कर्जातून मुक्ती मिळावी या मागणीसाठी मनसेचे राज्याचे शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याशी चर्चा

 


प्रश्न सोडविण्याबाबत गृह विभागाला दिल्या सक्त सूचना

पंढरपूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना महाराष्ट्रातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपनी कडून होत असलेल्या प्रचंड त्रासाबद्दल व महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करण्याबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. या शिष्टमंडळात  मनसे नेते माजी गृह राज्य मंत्री श्री बाळा नांदगावकर , मनसे सरचिटणीस तथा सहकार सेना अध्यक्ष श्री दिलीप धोत्रे, मनसे सरचिटणीस सौ.रिटा गुप्ता व सौ. शालिनी ठाकरे , महिला सेना उपाध्यक्षा सौ अनिशा माजगावकर उपस्थित होते. या वेळी अजितदादा पवार यांनी गृह खात्याचे सचिव श्री सीताराम कुंटे यांना बोलवून घेऊन हा प्रश्न तात्काळ सोडवावा असे आदेश दिले .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget