चरणूकाका पाटील हे राजकारण व समाजकारणातील एक सामंजस व्यक्तिमत्व होते :- सुशीलकुमार शिंदे




शिंदे साहेबांनी ब्रह्मपुरीत जाऊन केले पाटील कुटुंबीयांचे सांत्वन


 सोलापूर जिल्हा प्रतिनिधी


सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणातील एक समंजस व शेतकर्यांच्या भल्यासाठी आपले संपुर्ण आयुष्य व्यतीत केलेले व्यक्तिमत्व म्हणून आम्ही चरणूकाका पाटील यांच्याकडे आदराने पाहत होतो अशी भावना देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. 


      ते ब्रम्हपुरी येथे कै.चरणूकाका पाटील यांच्या  परिवाराच्या सांत्वनपर भेटीप्रसंगी बोलत होते.यावेळी संजय पाटील,राजेंद्र पाटील,दत्तात्रय पाटील यांच्यासह संपुर्ण पाटील परिवार उपस्थित होते.


    सुशीलकुमार शिंदे म्हणाले की,दामाजी साखर कारखान्याच्या अडचणीच्या काळात कै.चरणूकाका यांनी उत्तम काम करून कारखाना अडचणीतून सहज बाहेर काढला होता.कारखानदारीच्या माध्यमातून काकांनी ग्रामीण भागाच्या विकासाला एक चांगली दिशा देण्याचे काम केले होते.सरळमार्गी,संयमी,कष्टाची प्रचंड तयारी असणारे काका यांनी शेतकर्यांच्या हिताबद्दल शासनदरबारी आपले वजन वापरून काम करण्यावर नेहमीच भर दिला होता.40 वर्षापासून त्यांनी कारखानदारीच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी,कष्टकरी,सभासद यांचे हित जपण्याचे मोठे काम केले होते.


     यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते चेतन नरोटे,पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील(तुंगत),मंगळवेढा तालुकाध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार, सोलापूर जिल्हा काॅग्रेसचे उपाध्यक्ष अॅड अर्जून पाटील,सोलापूर जिल्हा अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात,जिल्हा काॅग्रेसचे कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी,काॅग्रेस भटक्या विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष मछिंद्र भोसले,

सोलापूर जिल्हा युवक काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे,ब्रम्हपुरीचे माजी सरपंच तानाजी पाटील,अशोक पाटील,अशोक मोरे,माणिक पाटील,प्रविण पाटील,आनंद पाटील,विकास पुजारी,रणजित पाटील,राजू पाटील,मनोज चव्हाण,सुरज चव्हाण,भैय्या मोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget