ज्ञानेश्वर (बापू)पांढरे यांचे निधन





वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

वाखरी तालुका पंढरपूर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कै. ज्ञानेश्वर विठोबा पांढरे यांचे काल दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी नऊ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले कै. ज्ञानेश्वर पांढरे हे ते वाखरी शिरढोण, इसबावी, या ग्रुप ग्रामपंचायतीचे चे पहिले सरपंच विठोबा भिवा पांढरे यांचे चिरंजीव होते. काल त्यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.वाखरी परिसरात जनमानसात सहज मिसळणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची खास ओळख होती.लहान मोठ्या व्यक्तींची ते सहजपणे चेष्टा मस्करी करीत असत.त्यामुळे पंचक्रोशीतील त्यांची ओळख "बापू"या नावानेच होत होती. सर्वांचे लाडके बापू यांचे निधन झाल्याने वाखरी परिसरात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात शिवाजी व उद्धव ही मुले असून, पत्नी, सुना,नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार असून युटोपीयन शुगर्स चे सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांचे ते चुलते होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget