वृत्तसंस्था // प्रतिनिधी
योगेश्वर संस्थान वरुर जऊळका येथे कोरोना काळामध्ये ज्या अधिकारी मंडळीनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करिता आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून जनसेवा केली आहे त्यांचा कोरोणा योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्याचे नियोजन संस्थांच्या उपक्रमा अंतर्गत चालू असून आज निवासी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद रुग्णालय अकोला डॉ. कृष्णमुरारी जी शर्मा साहेब, डॉ. रामकुमार शिवसाग वैद्यकीय अधिकारी अकोला, दह्यांडा पोलीस स्टेशन ठाणेदार प्रेमकुमार कात्रे साहेब, घोरमोळे साहेब दह्यांडा पो .स्टे., पिंटू भाऊ सीरस्कार प.स.सदस्य, कपिल भाऊ ढोके समाज सेवक, किशोर भाऊ बुले सरपंच केळीवेळी, डॉ गायत्री ताई गायकवाड वैद्यकीय अधिकारी सरकारी दवाखाना कावासा,विठाई ताई खडसे आषा वरकर कावसा , मुकुंदराव बकाल तंटामुक्ती अध्यक्ष या मान्यवर मंडळींना कोरणा योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्वप्रथम गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना श्री प्रेमानंद कात्रे साहेबांनी योग योगेश्वर संस्थांन मध्ये शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करून सोशल डिस्टंसिंग ,सेनी टायझर चा वापर ,जास्त ध्वनी प्रदूषण न करता आणि कमीत कमी मंडळी मध्ये चालत असलेल्या कार्यक्रमा बद्दल प्रशंसा केली व वारकरी संप्रदायाचे शासनाला व सरकारला कोरोणा काळामध्ये फार मोठे सहकार्य लाभले असून आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असून अजून संपलेला नाही पण कोरोना सोबत कसे जीवन जगता येईल याकरिता सावधानी बाळगणे अतिशय महत्वाचे आहे आज कोरोना काळ आमच्या करिता एक कसोटीचा काळ ठरलेला असून आम्ही त्यामध्ये तंतोतंत उतरण्याचा प्रयत्न केला आणि सर्व जनता आम्हाला परिपूर्ण सहकार्य करीत असल्याबद्दल जनतेचे आभार मानतो या शब्दात कात्रे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डॉ. कृष्णमुरारी शर्मा साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले सहा महिन्यापासून मी माझ्या मुला-बाळांना पासून दूर आहे आज पर्यंत घरी परत गेलेलो नाही आणि दिवसभर ड्युटी केल्यानंतर मी एकांतात बसून ध्यान धारणा करीत असतो अध्यात्माची सांगड असल्याशिवाय विज्ञानवादी जीवाला सुद्धा शांतता लाभू शकत नाही हा माझा स्वानुभव आहे आम्ही पेशंटवर उपचार करत असताना जात ,धर्म, पंत, हे अजिबात पाहत नसून आम्ही आमच्या कर्माला जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान दिलेले आहे कोरोना मुळे भारताची संस्कृती पूर्ण जगाला स्वीकारावी लागली आहे. हातात हात देण्याची संस्कृती आपली नसून दुरुनच हात जोडून नमस्ते करण्याची संस्कृती होती , कोणी मरण पावला म्हणजे तेरा दिवस सुतक पाडणे हा एक कोरोन टाईन पिरेड आहे , बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे ही भारत देशाची जुनी संस्कृती आता पूर्ण देशांमध्ये अंगीकारणे चालू आहे आज गणेश महाराज शेटे यांनी आम्हाला सन्मानपूर्वक संस्थांवर बोलवून आदर सत्कार केल्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो हे मनोगत साहेबांनी व्यक्त केले त्यानंतर डॉ. राजकुमार शिवसाग यांनी मनोगत व्यक्त करताना कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला आपुलकीच्या भावनेची गरज असून सुरक्षितता बाळगून सहानुभूतीची गरज असण्याचे मनोगत व्यक्त केले त्यानंतर डॉ गायत्री ताई गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते मराठ्यांची मुलुख मैदानी तोफ श्री कपिल दादा ढोके यांनी संस्थानच्या वतीने गणेश महाराज शेटे यांच्या मार्गदर्शनात चालत कार्यक्रम हा नवीन पिढीला चालना देणारा असून कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार मानले ह्या कार्यक्रमांमध्ये गावातील तरुण उत्साही मंडळ व संस्थांचे भक्तगण मंडळी उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.