वर्ष उलटलं तरी डाळींब उत्पादक पीक विम्यापासून वंचित.

 


आठ दिवसांत विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन!


मंगळवेढा: वारंवार एकापेक्षा एक नैसर्गिक संकटांशी तोंड देत असलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी मोदी सरकारने विम्याच सुरक्षा कवच दिल.त्यामुळे शेतकरी थोडफार धीर धरू लागला व कशी-बशी पैशाची जुळवा जुळव करून विम्याचा हप्ता भरू लागला, पण मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना गतवर्षी मृग बहरात शेतकऱ्यानी विमा भरला पण अद्याप शेतकरी नुकसान होऊन वर्ष उलटत आलं तरी शासन पीकविमा द्यायला तयार नाही., स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करून सुध्दा कृषी विभाग असो वा महसूल विभाग शेतकऱ्यांची दाखल घेत नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यानी तालुका कृषीअधिकारी कार्यालय गाठलं, व तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांना निवेदन देण्यात आलं की जर येत्या आठ दिवसात विम्यापासून वंचित असणाऱ्या तालुक्यातील कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण भागातील अंदाजे सहाशे ते सातशे शेतकऱ्यांचा पीक विमा येत्या आठ दिवसात जमा न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संगठना शेतकऱ्यांसहीत तीव्र आंदोलन करेल या वेळी तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार ,शंकर संगशेट्टी अविनाश नराळे मल्लप्पा चोखंडे व इतर शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget