सोलापूर जिल्ह्याला बसलेला पुराचा फटका हे अस्मानी संकटा सोबतच सुलतानी संकट!

 

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व उजनी धरणातून नदी काठच्या गावा मध्ये पाणी शिरून शेती जनावरे व नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

अतिवृष्टीमुळे पूरपरीस्थिती अटळ असली तरी हे नैसर्गिक संकटा सोबतच प्रशासनाच्या चुकीमुळे उद्भावलेले संकट असल्याची भावना पूरग्रस्त लोकांनी व्यक्ती केली आहे. 


उजनीच्या तसेच निरा नदी वरील धरणांच्या पाण्याचे ढिसाळ नियोजनामुळे अचानक सोडलेल्या पाण्यामुळे हातबाहेर जाणारी पूर परीस्थिती उद्भावली धरणांच्या पाणी नियोजनाच्या अभावामुळेच हातबाहेर गेलेल्या परीस्थितीस प्रशासन तितकेच जबाबदार आहे.


१२ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यात पाऊस सुरू झाला उजनी धरण फुल्ल भरले असतना व अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर सुद्धा १२,१३,१४, ऑक्टोबरच्या दुपार पर्यंत २० हजार क्युसेस ने पाणी धरणातून भीमा नदीत सोडले जात होते. 


१४ ऑक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास ४० हजार क्युसेसने पाचच्या सुमारास ८० हजार क्युसेसने तर मध्यरात्रीपर्यंत सव्वा दोन लाख क्युसेसने विसर्ग वाढवण्यात आल्याची आकडेवारी वर्तमानपत्रातून पुढे आली आहे.


तर वीर धरणातून निरा नदीत  13 व 14 ऑक्टोबरच्या दिवसापर्यंत  ६०० क्युसेसने विसर्ग झाला तर  14 ऑक्टोबरला रात्री आठ नंतर 43,000 क्युसेसने रात्री बारा नंतर म्हणजे 15 ला पहाटे 54,400 क्युसेसने  पाणी  निरेत सोडण्यात आले. अचानक सोडलेल्या पाण्यामुळे निरा नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नदीकाठची शेती वाहून गेली लोकांचे प्रचंड नुकसान झाले


उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन तासात २५० मिमी  पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढली व अचानक पाणी सोडावे लागले हे जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगत असले तरी १४ ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत पाणी सोडण्या बाबत उदासीन का होते ? हवामान विभागाने अगोदरच अतिवृष्टीचा इशारा दिला होता.नदी काठच्या गावां दंवडी देत दक्षतेचा कोणताही इशारा प्रशासनाकडून का दिला नाही? तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे उपाय का केला नाही असे म्हणत मोहिते पाटील यांनी प्रशासनास प्रश्न उपस्थित केले


इथे एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की १४ ऑक्टोबरला दुपारी ३ ते रात्री १२ पर्यंत ९ तासांच्या दरम्यान साधारणपणे दोन लाख क्युसेस इतक्या प्रचंड प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडण्यात आले या मुळे पंढरपूर पासून ते अक्कलकोट पर्यंतच्या नदीकाठच्या तसेच निरा नदीवरील धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे  निरा नदीकाठच्या गावात वाड्या वस्ती मध्ये पाणी शिरले यात प्रंचड प्रमाणात शेतक-यांचे नागरिकांचे नुकसान झाले. 


नैसर्गिक अतिवृष्टीमुळे मुळे पुरपरीस्थिती आलीच असती मात्र जलसंपदा व प्रशासनाच्या उदासीनते मुळे परीस्थिती हाता बाहेर गेली प्रशासनाच्या मोगलाई कारभारा मुळे शेक-यांवर असमानी संकट कोसळले तसेच पूराची तीव्रता ही कमी करता आली असती.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget