पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील स्व. राजूबापू पाटील यांचे चिरंजीव गणेश पाटील यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले व नवी सोपविलेल्या जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गेल्या काही दिवसापासून या निवडीकडे जिल्ह्यातील असंख्य युवकांचे लक्ष लागुन राहिले होते स्व.राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर पक्षाने गणेश पाटील यांच्यावर जिल्ह्यातील योग्य संघटनेची मोठी जबाबदारी दिली आहे जयंत पाटील यांनी गणेश पाटील यांचे स्वागत केले या निवडीनंतर भोसे गावात व परिसरात अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.