सोलापूर : दसऱ्याच्या मुहुर्तावर नवीन वाहन खरेदी जास्त प्रमाणात होत असल्याने नवीन वाहनांचा नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा यासाठी दसऱ्याच्या दिवशी राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये सुरू राहणार असल्याचे परिवहन उपायुक्त जितेंद्र पाटील यांनी कळविले आहे.
दसऱ्याच्या दिवशी नागरिकांची गैरसोय होऊ नये, शासकीय महसूल जमा व्हावा यासाठी रविवार दि. 25 ऑक्टोबर 2020 रोजी वाहन नोंदणीचे आणि कर वसुलीचे कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यादिवशी संबंधित अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून वाहन नोंदणी करणार आहेत, असे सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.