फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीला नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२० जाहीर



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

 

येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधील, फॅबटेक कॉ लेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयास २०२० चा नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अँड कॉन्फरेन्स अवॉर्डस जाहीर झाला आहे. 

   ‘रिसर्च इंटेलिजिअन्स प्रा. लि. बंगळुरू’ यांच्यातर्फ दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजी ‘ताज वेस्ट एन्ड बंगळुरू’ या ठिकाणी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांना अवॉर्ड देऊन सन्मानित कण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी दिली आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्द्दल संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांचे अभिनंदन केले.


    ‘नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२०’ यामध्ये देशभरातील २५० हुन अधिक  महाविद्यालये, अनेक अकॅडमिक इन्स्टिटयूट, तसेच शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली. हा अवॉर्ड महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा यामध्ये महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर, सुसज्ज्य लॅब, इन्स्ट्रुमेंट, कॉम्प्युटर लॅब, वर्गखोल्या, लायब्ररी, सेमिनार हॉल तसेच याठिकाणी असणारे अनुभवी प्राध्यापकवर्ग व महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल याबाबींची दाखल घेऊन जाहीर करण्यात आला आहे. सांगोला सारख्या ग्रामीण भागामध्ये असणारे हे महाविद्यालय व याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा हि महाविद्यालयाची जमेची बाजू आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तास घेतले जात आहेत. तसेच या पुरस्काराचे सर्व श्रेय याठिकाणी ज्ञानदान करीत असलेल्या सर्व प्राध्यापकांना देण्यात येत आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी समाधान व्यक्त केले आहे.

    फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांचा सत्कार संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर  यांनी शाल व श्रीफळ  देऊन केला. कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार, स्टुडन्ट डीन प्रा. टी. एन. जगताप  यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अभियांत्रिकी,पॉलिटेक्निक व फार्मसी महाविद्यालयातील सर्व शिक्षक  व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget