पांडुरंग कारखान्याचा 29 वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न



 कामगारांना 15 टक्के बोनस, भविष्यात दहा हजार टन  गाळप क्षमता करणार -:-प्रशांतमालक परिचारक


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा २९व्या गळीत हंगामाचा शुभारंभ  चेअरमन प्रशांत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी कै.सुधाकरपंत परिचारक यांचे जुने सहकारी,मित्र व कारखान्याचे ज्येष्ठ सभासद ह-भ-प बाळशास्त्री हरिदास, संपादक बाळासाहेब बडवे, घन:श्याम काटकर, नानासाहेब गाजरे, मारुती देशमुख, मल्हारी वाघमारे, लक्ष्मीनारायण भट्टड, सिताराम नागणे, भीमाशंकर भिंगे, आनंदराव क्षिरसागर, वसंत पाटील, बळवंत व्हळगळ, परमेश्वर मस्के, हरी खंडेकर, वसंतराव बंडगर, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, चेअरमन प्रशांत परिचारक, व्हाईस चेअरमन वसंतराव देशमुख, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते गव्हाणी मध्ये  ऊसाची मोळी टाकून व सत्यनारायणाची महापूजा करून करण्यात आला. यावेळी ज्येष्ठांचे फेटे बांधून सत्कार करण्यात आले व  कै.सुधाकरपंत परिचारक  यांची प्रतिमा भेट देण्यात आली.


यावेळी  कारखान्याचे कर्तव्यदक्ष MD डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  कै.सुधाकरपंत परिचारक यांचे जुने ज्येष्ठ सहकारी व मित्र ह-भ-प बाळशास्त्री हरिदास व बाळासाहेब बडवे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी सर्व जुन्या मोठ्या मालकांच्या सहकाऱ्यांना आपले अश्रू थांबवता आले नाहीत.

यावेळी चेअरमन प्रशांत परिचारक यांनी कामगारांना दिवाळीसाठीचा बोनस 15 टक्के जाहीर केला. तसेच भविष्यामध्ये हा कारखाना दहा हजार टन गाळप क्षमतेचा करणार असून, इथेनॉल निर्मिती भर देऊन इथेनॉलची क्षमता वाढवणार आहोत. असे आपल्या अध्यक्षीय भाषणां मधून जाहीर केले. यावेळी व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख, दाजी पाटील, दिनकरभाऊ मोरे, दिलीपराव चव्हाण, दिनकर नाईकनवरे, बाळासाहेब यलमार, हरिषदादा गायकवाड,  तानाजी वाघमोडे, नागन्नाथ शिंदे, दिनकर कवडे, सुरेश आगावणे, ज्ञानदेव ढोबळे, शिवाजी साळुंखे, महीबुब शेख, नामदेव झांबरे, आनंदराव आरकिले, परमेश्वर गणगे, संगिता पोरे, पार्वती नरसाळे, सिंधूताई पवार, अरुण घोलप, भिमराव फाटे, अरुण घोलप, प्रणव परिचारक,राहुल रेडे, मौला पठाण,  संदीप घाडगे, अजित पोखरे, भिमराव रेडे, सर्व सभासद शेतकरी, परिसरातील ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील, चीफ केमिस्ट एम आर कुलकर्णी, केन मॅनेजर एस सी कुमठेकर, चीफ अकाऊंटंट आर. एम.काकडे, मटेरियल मॅनेजर एम.जे.देशपांडे, डेप्युटी चीफ इंजिनियर एम. डी बारटक्के, को जन मॅनेजर एस एस विभुते, डीस्टी. इन्चार्ज एस. ई. शेख, डे.चीफ केमिस्ट एम. एल उपासे, ऊस विकास अधिकारी एस. पी.भालेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पोफळे, कॉम्प्युटर इन्चार्ज तानाजी भोसले, सिव्हिल इंजिनिअर एच. एस.नागणे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर एस. वाय.सय्यद, हेड टाईम किपर एस.एन.कदम, सिक्युरिटी ऑफिसर एम एस घाटुळे, जनसंपर्क व स्थावर ऑफिसर आर. डी. गाजरे, सर्व संचालक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ.सुधीरपोफळे यांनी केले

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget