चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळली, सहा जणांचा मृत्यू, घटनास्थळी आक्रोश





पंढरपूर // प्रतिनिधी 

सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंढरीत हाहाकार उडाला आहे. चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत दुपारी अडीच वाजता कोसळली. या घटनेत 6 जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती आहे.  

पावसामुळे या भिंतीच्या आडोशाला काही लोक उभे होते. यामुळे मोठ्या संख्येने लोक या दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खास करून काठावर भीक मागणारे भिकारी या भिंतीच्या आडोशाला होते.

भिंत कोसळल्याने त्याचा मोठा आक्रोश सुरू झाला होता. नक्की ढिगाऱ्याखाली किती लोक दाबले गेले याची चिंता असून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले मुख्याधिकारी अनिकेत मानूरकर हे जेसीबी व रुग्णवाहिकेसह घटनास्थळी रवाना झाले आहेत शहराच्या विविध भागातून उपनगरातून आजच्या पावसाने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीपासून पावासाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील  अक्कलकोटमधील राजवाड्याचा बुरूज ढासळला. वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेला होता. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने पंढरपूर तालुक्याला झोडपले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget