पांडुरंग कारखान्याचे बॉयलर अग्नि प्रदीपन कधी होणार ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.




(मालक काय घोषणा करणार‌?)

सोलापूर // प्रतिनिधी 

दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिना आल्यानंतर सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व सभासदांना व गाडी मालक चालक व सर्व ऊस तोडणी कामगारांना व सर्व संबंधित यंत्रणेला एकच प्रश्न पडतो की आपल्या कारखान्याचा बॉयलर कधी पेटणार?


चालू 2021 गळीत हंगामामध्ये सर्वच सोलापूर जिल्ह्यातील कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप मोठे उसाचे प्रमाण असल्यामुळे सर्व शेतकरी सभासदांना माझा ऊस कधी गळीताला जाईल याची फार मोठी काळजी लागून राहिलेली असते.

त्याचप्रमाणे साखर कारखान्याच्या चेअरमन ला व संबंधित या कारखान्याच्या संचालकाला वारंवार विनंती करून माझा ऊस मात्र तेवढ्या लवकर आपल्या कारखाने कडे घेऊन जावा अशी विनवणी प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला करावी लागते. 


पण जसा काळ बदलला त्याच पद्धतीने कारखानदारीच्या सर्व व नियम अटी सुद्धा बदललेल्या आहेत. ज्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना संपूर्ण पंढरपूर तालुक्याची आजपर्यंत आर्थिक भिस्त होती. त्या कारखान्याचा गेल्या वर्षी गळीत हंगाम सुरू होऊ शकला नाही त्याच्यामागे अनेक कारणे आहेत त्याच बरोबर पंढरपूर मंगळवेढा व माळशिरस तालुक्यातील (मतदार संघातील) सर्वात मोठा गणला जाणारा श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना या कारखान्यावर उद्या दोन ते तीन तालुक्याची आर्थिक गणिते अवलंबून आहेत. या कारखान्याने. आज पर्यंत एफ आर पी त्याचप्रमाणे सर्वच पातळीवरच्या गोष्टींमध्ये आघाडी घेतली आहे कारखान्याने दरवर्षी नवनवे विक्रम प्रस्थापित केलेले आहेत त्याचप्रमाणे कारखाने सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर देऊन जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडे येण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या कारखान्याने आजपर्यंत पंढरपूर माळशिरस व मंगळवेढा व आसपासच्या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने दर देऊन एक चांगले काम साखर कारखानदारीत केले आहे.

स्वर्गीय मोठे मालक सुधाकरपंत परिचारक यांनी सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना दृष्टीक्षेपात ठेवुन सर्वांचे हित साधले आहे मोठ्या मालकांच्या अचानक जाण्यामुळे सहकार व साखर कारखानदारी क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे आता त्याच कारखान्या वरती त्यांचे पुतणे आमदार प्रशांतराव परिचारक हे चेअरमन झाले आहेत सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांवर प्रेम करून आमदार परिचारक यांनी आजपर्यंत फार मोठे काम केले आहे त्यांच्यावर आता फार मोठी कारखानदारीची जबाबदारी पडली आहे येत्या गळीत हंगामामध्ये आमदार प्रशांत मालक दराची घोषणा करतात का त्याचप्रमाणे अजून काय नवीन उपाय योजना साखर कारखानदारीत करतात का व स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा साखर कारखानदारीतील ऊसदराबाबत चा निर्णय पुढे नेतात का व आपल्या कुश अग्र अशा बुद्धी कौशल्याने सर्व सभासद शेतकऱ्यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतात का व आपल्या बॉयलर प्रदीपन व गळीत हंगामाची सुरुवात कधी करतात याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget