सभासदांनी आपला ऊस दामाजीसच घालून सहकार्य करावे- समाधान आवताडे.
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
साखर कारखान्यासमोर आर्थिक अडचणी आहेत. मात्र अडचणीतून मार्ग काढीत ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांचे हित समोर ठेवुन आमची वाटचाल सुरु आहे. शेतकयांनी आमच्यावर विश्वास ठेवुन या हंगामात आपला ऊस दामाजी कारखान्यास गळीतास घालावा. फक्त साखर उत्पादन करुन आपणांस इतर कारखान्यांबरोबर ऊस दर देणेबाबत स्पर्धा करणे अडचणीचे असलेने लवकर इथेनॉलचे उत्पादन सुरु करणार असलेचे यावेळी कारखान्याचे चेअरमन मा. समाधान आवताडे यांनी सांगितले.
कारखान्याच्या 28 व्या गळीत हंगामाचे गव्हाण व मोळी पुजन कारखान्याचे चेअरमन मा.समाधान आवताडे यांचे शुभहस्ते व व्हा.चेअरमन मा.अंबादास कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाचे सुरुवातीस श्री सत्यनारायण महापुजा कारखान्याचे संचालक लक्ष्मण एकनाथ जगताप व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री लक्ष्मण जगताप या उभयतांच्या हस्ते संपन्न झाला.
कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कारखान्याचे चेअरमन मा.श्री. समाधानदादा आवताडे , मार्गदर्शक मा.बबनराव आवताडे, व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली सुरळीत सुरु आहे. आपण चालु गाळप अत्यंत अडचणीवर मात करीत गाळप सुरु करीत आहे. चालु गाळप हंगामातील सहा लाख गाळपाचे उद्दिष्ट कामगार चांगल्या प्रकारे कमीत कमी खर्चात पार पाडतील अशी ग्वाही त्यांनी दिली. कामगारांनी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप करुन लॉसेस कमी करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रा.येताळा भगत म्हणाले की, अत्यंत अडचणीच्या काळामध्येही संचालक मंडळांनी चार हंगाम पूर्ण केले. कारखाना टिकला तरच आपण टिकु अशी भुमिका कामगारांची आहे. कारखान्याच्या संचालक मंडळास गेल्या चार वर्षामध्ये कर्मचारी व कामगार संघटनेने चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना चेअरमन समाधान आवताडे म्हणाले की, आमचे संचालक मंडळ आलेपासून चारही गाळप हंगाम दुष्काळाच्या सावटाखाली गेले. चालु हंगामाकरिता चांगला पाऊस झाल्याने ऊसाची वाढ चांगली झाली आहे. ऑफ सिझनमधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. कामे वेळेत पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या. अनंत अडचणीवर मात करीत संचालक मंडळाने सहा लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ते नक्की पूर्ण करणार आहोत. सध्या ऊस वाहतुकदार, तोडणी ठेकेदार आणि शेतकरी यांची सर्व देय असणारी देयके पूर्ण केलेली आहेत. सध्या आर्थिक अडचणी असलेमुळे कामगारांचे पगार वेळेवर करता आले नाहीत.संचालक मंडळाच्या वतीने कामगारांचे थकीत पगारापैकी निम्मा पगार व कामगार दिवाळी बोनस 8.33 टक्क्े येणाया दिपावळी पर्यंत देण्यांत येईले असे अभिवचन चेअरमन यांनी दिले. दामाजी कारखाना सहकारी तत्वावरील असुन तुमच्या सभासदांच्या हक्काचा कारखाना आहे. कारखान्याचे संस्थापक कि.रा.मर्दा उर्फ मारवाडी वकील यांनी दुरदृष्टी ठेवून या भागातील शेतकयांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन व्हावे, ऊस पिकाच्या माध्यमातुन ते आर्थिकदृष्टया सक्षम व्हावेत, तरुणांच्या हाताला काम मिळावे. यासाठी कारखान्याची उभारणी केली. अडचणीच्या काळामध्ये कामगारांनी चांगलेस सहकार्य केल्यामुळे चेअरमन यांनी सर्व कामगारांचे आभार मानले. तरी चालू हंगामात जास्तीत जास्त ऊस उत्पादक सभासदांनी विश्वास ठेवून ऊस दामाजीसच घालावा असेही शेवटी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास तसेच दामाजी मंदिर समितीचे चेअरमन विष्णुपंत आवताडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण पं.स.माजी सभापती प्रदिप खांडेकर, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे यांचेसह कारखान्याचे संचालक राजीव सुब्रााव बाबर, राजेंद्र सर्जेराव पाटील, शिवयोग्याप्पा सायबण्णा पुजारी, बापू मधुकर काकेकर, बसवेश्वर शंकर पाटील, मारुती लिंगाप्पा थोरबोले, लक्ष्मण आमुंगी नरुटे, भुजंगराव मारुती आसबे, सुरेश बापू भाकरे, बाळासोा पांडुरंग शिंदे, सचिन गोपाळ शिवशरण, अशोक आण्णाप्पा केदार, सौ.स्मिता प्रमोदकुमार म्हमाणे, सौ. कविता भारत निकम, संजय सुब्रााव पवार, विजय धानाप्पा माने तसेच रावसाहेब राजमाने, शाम पवार, दत्तात्रय जमदाडे,चंद्रकांत गोडसे, अविनाश मोरे, बाबा जाधव, मेटकरी गुरुजी,दगडू सुतार, वसंत लेंडवे, कामगार संघटनेचे अध्यक्ष -विठ्ठलराव गायकवाड, कामगार पतसंस्थेचे चेअरमन –विश्वास सावंजी , विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, सिझन कामाचे कंत्राटदार,शेतकरी सभासद कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन ए.एम.उन्हाळे यांनी केले तर कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण यांनी आभार मानले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.