सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पातळीवरील किसान काँग्रेसच्या पदभारांमध्ये अलीकडेच काही महत्वाचे बदल करण्यात आले त्यानुसार सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर प्रा. संग्राम चव्हाण यांची फेरनियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र काँग्रेस भवन येथे रविवारी माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी श्री बाळासाहेब शेळके माजी जिल्हाध्यक्ष, श्री अर्जुन पाटील ,उपाध्यक्ष श्री. व. पु. जमादार,प्रा.संदिप साठे , प्रा. उल्हास सोनार ,श्री षटगार साहेब व इतर काँग्रेसजन उपस्थित होते.
चौकट:-
प्रा.संग्राम चव्हाण व प्रा.संदिप साठे हे दोघेही मूलतः शेतकरी कुटुंबातून आलेले असून इंग्रजी विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत ,अशा उच्चशिक्षित तरुणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात आपापले योगदान देण्याचा कसोशीनं प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. पक्षाने त्यांच्यावर सोपविलेल्या या नवीन जबाबदारीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी आपल्या लेखणी व वाणीचा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे वापर करावा असे प्रेरणादायी उद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रा.संग्राम चव्हाण तसेच पश्चिम महाराष्ट्र किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रा.संदिप साठे यांचा गौरव करण्यात आला.त्यांनीही श्री चव्हाण व श्री साठे यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
-:माजी केंद्रीय गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.