सोलापूर // प्रतिनिधी
श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे नामकरण श्रीमंत सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखाना करणे व कारखाना कार्यस्थळावर स्व. परिचारक यांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव माजी अध्यक्ष दिनकर मोरे यांनी मांडला. यास एकमताने मंजुरी देण्यात आली.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 29 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक यांच्या व संस्थापक कै. सुधाकरपंत परिचारक यांचे जुने सहकारी व ज्येष्ठ सभासद यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना सर्वच मान्यवरांनी स्वर्गीय पंताच्या आठवणींना उजाळा दिला. माजी अध्यक्ष दिनकर मोरे म्हणाले पंत शेतक-यांसाठी देवा प्रमाणे होते त्यामुळच कारखान्यास त्यांच नांव द्याव व त्यांचा पुतळा कार्यस्थळावर उभा करावा त्यांच्या या ठरावास उपस्थित सर्वांनी टाळ्याच्या गजरात एकमुखी मान्यवर दिली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख सर्व संचालक कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व सभासदांची मोठी उपस्थित होती.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.