गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये महाभयंकर अशा अतिवृष्टीने थैमान घातलेले असताना त्यामुळे सर्व पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे त्यानंतर पंढरपूर शहरात व संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये 13 वर्षातील सर्वात मोठा महापुर घेऊन गेला. त्यानंतर लगेचच काही राज्यातील मोठ्याने त्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन सुरू झाले त्या अनुषंगाने कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कोल्हापूरचेखासदार छत्रपती संभाजी राजे, याच बरोबर आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांनी स्वतः दौरा केला आहे त्याचबरोबर उद्या एक दिनांक सोमवार 19 ऑक्टोबर रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्या सर्व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार अनेक मातब्बर नेते मंडळींचे दुष्काळग्रस्त भागांमध्ये दौऱ्याचे आयोजन आहे.
पण सर्व शेतकऱ्यांचे कायम प्रश्न मार्गी लावणारा नेता म्हणून त्याच्याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे त्या माजी खासदार राजू शेट्टी सुद्धा यांचा सदा उद्या पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथे येथे पीक पाहणी दौरा आयोजित केला आहे सर्व नेतेमंडळींचे दौरे आयोजित केलेला असताना उल्लेखनीय बाब म्हणजे स्वतः खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपूर तालुक्यातील एका ग्रामीण भागांमध्ये जाऊन पीक विम्याची पाहणी करणे पसंत केले आहे यालाच खरे शेतकऱ्यांचे कैवारी असे म्हणले पाहिजे राजू शेट्टी यांच्या दौऱ्यामुळे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना एक नवी ऊर्जा प्राप्त होणार आहे हा कोणताही शासकीय दौरा नसून फक्त काबाडकष्ट करून शेतामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चा दौरा असल्याचे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मा खा राजू शेट्टी साहेब हे कोरोना मुक्त होऊन नुकतेच बाहेर पडले आहेत अशा कठीण परिस्थितीमध्ये सुध्दा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यथा जाणारे शेतकऱ्यांचे दैवत आहेत.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.