साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत स्वाभीमानीने सुचवल्या सुधारणा,अंमलबजावणी करण्यास कारखान्यांना भाग पाडावे स्वाभिमानीची मागणी




वृत्तसंस्था// प्रतिनिधी

साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत स्वाभीमानीने सुचवल्या सुधारणा,अंमलबजावणी करण्यास कारखान्यांना भाग पाडावे स्वाभिमानीची मागणी

साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत स्वाभीमानीने सुचवल्या सुधारणा,अंमलबजावणी करण्यास कारखान्यांना भाग पाडावे स्वाभिमानीची मागणी

                     

ऊस हंगाम 2020/21 काही दिवसात सुरु होणार आहे. वजनमापे मापन विभागामार्फत साखर कारखान्यांच्या वजन काट्यांना वैधता प्रमाणपत्र देण्याचे बहुदा सुरु झाले असेल. हंगामाच्या अगोदर या विभागाला आम्ही लेखी निवेदन देऊन वजन करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा सुचवल्या आहेत व त्याची अंमलबजावणी कारखान्याना करण्यास भाग पाडावे अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पप्पु पाटील, इक्कबाल मुजावर , सचिन मस्के, सचिन राऊत यांनी निवेदनाद्वारे केली यामध्ये प्रामुख्याने भरलेले वाहन कारखाना कार्यस्थळावर आलेनंतर त्याचे तात्काळ वजन करून मगच नंबरला लावावे. 

भरलेल्या वाहनाचे वजन करून त्याची वजनस्लिप ऑटो जनरेटेड वेईन्ग मशीन वरील पावती वाहन धारकाकडे (मालकाकडे)देण्याची व्यवस्था करावी.  शेतकऱ्याला वजन काट्यापर्यंत येण्यास मज्जाव केला जातो. त्याबाबतीत काट्याजवळ माहिती फलक लावण्याची कारखान्यांना सक्ती करावी.  

वजनकाट्याच्या वैधतेबद्दल कोणालाही सॅम्पल वजनाद्वारे खात्री करण्याची मुभा असावी (तसा फलक असावा) शेतकऱ्याला वजनाबाबत तक्रार करायची झाल्यास कोणाकडे करावी त्याचा माहिती फलक काट्याशेजारी अधिकाऱ्यांच्या मोबाईल नं सह उभारावा. बाहेरच्या काट्यावर शेतकऱ्याने वजनाच्या खात्री साठी वजन केल्यास कारखाना असे वाहन नाकारतो त्याबाबत कारखान्यांना सूचना कराव्यात. ऊस नियंत्रण आदेशानुसार वजनकाटे हे इलेक्ट्रॉनिक व ऑटो जनरेटेड असावेत असे निर्देश आहेत. त्यामुळे वजन करण्याच्या व पावती देण्याच्या प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप असता कामा नये याबाबतीत खात्री करून व अट घालून साखर कारखान्यांना वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. * साखर कारखाने हे भरलेल्या वाहनांची पावती काढत नाहीत, वाहन रिकामे होऊन आलेनंतर वजावट करून पावती वाहन चालकाकडे देतात, तसेच वाहन काट्यावर उभारले नंतर वजन त्यांनी स्वतः विकसित केलेल्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअर द्वारे संगणकावर घेतात, त्यामध्ये वजनात फेरफार करण्याला पर्याय उपलब्ध असतो व तसे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत, म्हणून आपण प्रत्येक कारखान्याला ऑटो वेवींन्ग मशीन बसवनेची सक्ती करावी वरील सर्व मुद्द्यांची कारखान्यांच्या पूर्तता करून घेतल्यानंतरच नोंदणी प्रमाणपत्र आपण द्यावे अशी जिल्हाधिकरी, साखर सहसंचालक व सहाय्यक नियंत्रक वैध मापन शास्त्र सोलापुर यांना करण्यात आली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget