राज्यातील बार, परमिटरुम उघडले परंतु धार्मिक स्थळे, मंदीरे उघडले नाही





वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

कोरोना महामारी असतानाही राज्यातील बार, परमिटरुम उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली परंतू धार्मिक स्थळे, मंदीरे यावर उपजिविका करणाऱ्या हार, उदबत्ती, नारळ, अबीर, गुलाल विक्रेते अशा विविध छोट्या छोट्या व्यावसायीकांची लाखो दुकाने आजही "श्री हरीला" बंदीस्त केल्यामुळे बंद असल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे, मस्जिद, धार्मिक स्थळे पुर्ववत सुरु करावीत यासाठी भारतीय जनता पार्टीचे वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मोहोळ तालुका अध्यक्ष ञसतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मोहोळचे नायब तहसीलदार सुरेश गायकवाड यांचे मार्फत तशा आशयाचे निवेदन दिले. 


यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय कुर्डे, मोहोळ शहराध्यक्ष सुरेश राऊत, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष तानाजी दळवे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष महेश चेंडगे, तालुका सरचिटणीस अॅड हेमंत शिंदे, जेष्ठ नेते रामचंद्र खांडेकर, संजीव खिलारे, ऑल इंडिया धनगर समाजाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अनंत नागनकेरी, विठ्ठल माने, दत्तात्रय कारंजकर, माणिक आवारे, भारत आवारे, सचिन काळे, रविंद्र निळ, धर्मराज दळवे, नितीन पवार, भिमराव सलगर, रामचंद्र शेळके, प्रभाकर दळवे, अरुण डोंगरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget